Join us

करीना कपूरची लंडनवाली बहिण आलिया लाइमलाइटपासून आहे दूर, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 15:05 IST

करीना कपूरच्या या बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

भारतीय चित्रपट आणि कपूर कुटुंबाचे नाते खूप जुने आहे. कपूर कुटुंब असे एक कुटुंब आहे जे कित्येक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवित आहे. पृथ्वीराज कपूर, ऋषी कपूर, शशी कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर सोबत असे कित्येक कलाकार आहेत ज्यांचा या कुटुंबाशी संबंध आहे आणि यांनी सिनेइंडस्ट्रीत खूप नाव कमाविले आहे. मात्र या सर्वांमध्ये कपूर कुटुंबातील असे काही सदस्य आहेत, जे आज लाइमलाइटपासून दूर आहेत. ज्यात आलिया कपूरचादेखील समावेश आहे. जाणून घेऊयात आलिया कपूरबद्दल...

पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले आहेत. राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या त्यांच्या तिन्ही मुलांनी बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले आणि सिनेइंडस्ट्री गाजवली होती. यानंतर कपूर कुटुंबातील नवीन पिढी समोर आली यात रणधीर कपूर, बबीता, ऋषी कपूर, नीतू कपूर, राजीव कपूर, कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूरचा समावेश होता. या सर्वांनीदेखील त्यांच्या काळात इंडस्ट्रीत खूप लोकप्रियता मिळवली.

त्यानंतर आताची यंग जनरेशनमध्ये करिष्मा कपूर, करीना कपूर, रणबीर कपूर, अरमान जैन, आदर जैन, रिद्धिमा कपूर साहनी यांचा सामावेश होते. हे सर्व जण आपल्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफमुळे लाइमलाइटमध्ये येत असतात.

करीना, करिश्मा आणि रणबीरची चुलत बहिण आलिया लाइमलाइटपासून दूर आहे. शशी कपूर आणि त्यांची पत्नी जेनिफरचा मुलगा करण कपूर माजी भारतीय अभिनेता-मॉडेल आणि फोटोग्राफर आहे. तो आणि त्याची पत्नी लोरना यांची लेक आलिया आहे. ती आई वडिलांसोबत लंडनमध्ये राहते. आई वडिलांप्रमाणे आलियाचा लूकदेखील युरोपियन आहे. तिचा जन्म आणि पालन पोषण लंडनमध्येच झाले आहे.

लंडनमध्ये राहूनही आलिया आपल्या चुलत भाऊ बहिणींच्या जास्त क्लोज आहे. ती नेहमी कपूर कुटुंबाच्या फंक्शनमध्ये पहायला मिळते.

टॅग्स :करिना कपूर