Join us

करीना कपूर बेबी बंपसोबत करतेय शूटिंग, बहिण करिश्मा कपूरने शेअर केले क्यूट फोटो

By तेजल गावडे | Updated: October 27, 2020 16:00 IST

करीना कपूर प्रेग्नेंट असून ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर प्रेग्नेंट असून ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सैफ अली खान आणि करीना कपूरने ते दोघे पुन्हा एकदा आई-वडील बनणार असल्याचे सांगितले होते. जानेवारी, २०२१ ला त्यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. यादरम्यान सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो व व्हिडीओ पहायला मिळाले ज्यात करीना गर्भावस्थेतही तिचे वर्क कमिटमेंट्स पूर्ण करताना दिसते आहे.

करीना आज तिच्या घरी बहिण करीश्मा कपूरसोबत शूटिंग करताना दिसली. करिश्माने इंस्टाग्रामवर करीना बुमरँग व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात करीना खुर्चीवर बसून मेकओव्हर करताना दिसते आहे.

व्हाईट टी शर्ट परिधान केलेल्या करीनाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसतो आहे. तिचा क्युट व्हिडीओ शेअर करत करीश्माने लिहिले की, बहिणीसोबत काम करणे नेहमीच मजा येते. 

यासोबत मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोमध्ये करीना आणि करीश्मा त्यांच्या घराच्या बाल्कनीत शूटिंग करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होतो आहे आणि त्याची खूप चर्चादेखील होताना दिसते आहे.

करीना कपूरने २० डिसेंबर, २०१६मध्ये पहिला मुलगा तैमूर अली खानला जन्म दिला होता. तैमूरच्या जन्माच्या आधी प्रेग्नेसीदरम्यान करीना अशाच रितीने आपल्या शूटिंगच्या कामात व्यग्र दिसली होती.

करीना कपूरने हल्लीच लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमीर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

टॅग्स :करिना कपूरकरिश्मा कपूर