करिना कपूर म्हणे, आणखीन 20 वर्षे ती चित्रपटात काम करणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 13:42 IST
करिना कपूर खानने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच करिना कपूरने आपल्या करिअरमध्ये 18 वर्ष नुकतीच ...
करिना कपूर म्हणे, आणखीन 20 वर्षे ती चित्रपटात काम करणार !
करिना कपूर खानने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच करिना कपूरने आपल्या करिअरमध्ये 18 वर्ष नुकतीच पूर्ण केली आहेत. यावर करिना म्हणाली की, हे माझ्यासाठी ही सम्मानजनक आणि अतिशय चांगली होता. गेल्या 18 व्रषांपासून माझा हा प्रवास सुरु आहे. तसेच पुढची दोन दशक तो असाच सुरु राहिल अशी आशा आहे. करिनाने 2000 मध्ये आलेल्या रिफ्यूजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जब वी मेट, कभी खुशी कभी गम, तलाश, युवा, ओमकारा आणि उडता पंजाबसारखे अनेक हिट चित्रपट तिने दिले. 2016 मध्ये आई बनल्यानंतर ती एक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिली होती. त्यानंतर 2018मध्ये ती आपल्याला शशांक घोषच्या वीरे दी वेडिंगमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे. ALSO READ : कोणी अभिनेता नव्हे तर हा राजकारणी आवडायचा करिना कपूरलाकरिना म्हणाली की, या चित्रपटाला घेऊन ती फारच उत्साहित आहे. चित्रपटात ही सगळ्या महिलाच आहेत तर चित्रपटाच्या निर्माताही दोन महिला आहेत. हा एक मजेदार चित्रपट आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. लॅक्मे फॅशन वीकमध्ये करिनाने रॅम्पवॉकवर आपला जलवा दाखवला. डिझायनर अनामिक खन्नाच्या शोची ती शो स्टॉपर होती.