Join us

OMG! करिना कपूरला मरेपर्यंत करायची ही गोष्ट, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:00 IST

एका मुलाखती दरम्यान करिनाने हा खुलासा केला.

 

करिना कपूर बॉलिवूडमध्ये जवळपास दोन दशकांपासून सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान करिना म्हणाली, ही 20 वर्षे खूपच सुंदर होती. या 20 वर्षेच्या प्रवासात मला अनेक चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. माझा जन्म अभिनय करण्यासाठी झाला आणि मला अभिनयाचं प्रचंड वेड आहे. मला विश्वास आहे की मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करत राहिन.  

 वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, करीना लवकरच 'हिंदी मीडियम २'मध्ये दिसणार आहे. करिना कपूर यात एक महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याआधी अशी भूमिका कधी साकारलेली नाही.

पहिल्यांदा करीना आणि इरफान एकत्र काम करताना दिसणार आहेत. एका मुलाखाती दरम्यान करिनाने आपल्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले होते की, ''अंग्रेजी मीडियममध्ये माझी भूमिका खूपच वेगळी आहे. हा एक वेगळा अनुभव असणार आहे. माझी भूमिका यात लहान  आहे पण इंटरेस्टिंग आहे. मला माझ्या कंम्फर्ट झोनच्या बाहेरच्या भूमिका करायच्या आहेत.''    

अंग्रेजी मीडियम सिनेमात मिठाई व्यापारी चंपकजीच्या भूमिकेत इरफान दिसणार आहे. अंग्रेजी मीडियम सिनेमाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत. या चित्रपटात इरफानसोबत दीपक डोबरियाल व राधिका मदन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :करिना कपूर