Join us
Daily Top 2Weekly Top 5

19 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये करिना कपूरने पहिल्यांदा केली ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 07:15 IST

करिना कपूर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खानच्या या आगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अर्थात हा रोल तिला सहज मिळाला नाही.

ठळक मुद्दे‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेमध्ये आहे.

करिना कपूर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिर खानच्या या आगामी चित्रपटात करिना लीड रोलमध्ये दिसेल. अर्थात हा रोल तिला सहज मिळाला नाही. होय, 19 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये या रोलसाठी करिनाला पहिल्यांदा ऑडिशन द्यावे लागले. खुद्द करिनाने एका ताज्या मुलाखतीत याबद्दल माहिती दिली.

आमिर खानला मी चांगलेच ओळखते. त्याला या रोलसाठी 100 टक्के हमी हवी होती.  एक दिवस मला आमिरचा कॉल आला. तू या चित्रपटाचा विचार करावास, असे तो मला म्हणाला. यानंतर मी आमिरला भेटायला गेले. त्याने काही मिनिटे स्क्रिप्ट ऐकवली आणि अचानक चल, आता काही सीन्स वाचू, असे मला म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण याआधी कधीच मी असे काही केले नव्हते. पण असे करण्यात काहीही वाईट नाही, हे मला जाणवले आणि मी आमिरची इच्छा पूर्ण केली. अशापद्धतीने मी या चित्रपटासाठी सिलेक्ट झाले. खरे तर हे एकप्रकारचे ऑडिशन होते.

19 वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा ऑडिशन दिले. सैफला मी याबद्दल सांगितल्यावर त्याची प्रतिक्रियाही आमिरसारखीच होती. अल पचीनो असता तर त्यानेही या भूमिकेसाठी टेस्ट दिली असती. मग तुला काय अडचण होती? असे तो मला म्हणाला होता.

 39 वर्षीय करिना कपूरने करिअरमध्ये  थ्री ईडियट्स, जब वी मेट,  बॉडीगार्ड, सिंघम रिटर्न्स, गोलमाल 3 यांसारखे अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत. मात्र तिला आतापर्यंत कधीही ऑडिशनचा सामना करावा लागला नाही. आमिरने मात्र तिचे ऑडिशन घेतलेच. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट 1994 मध्ये आलेला अमेरिकन कॉमेडी ड्रामा चित्रपट  ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रीमेक आहे.  

टॅग्स :करिना कपूर