Join us

शाहिद कपूरच्या आधी विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती करीना कपूर, अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 15:35 IST

कलाविश्वात करीना आणि शाहिद यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. पण शाहिद कपूरच्या आधीही करीना कपूर एक रिलेशनशीपमध्ये होती.

अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची लव्हस्टोरी सगळ्यांनाच माहित आहे. जवळपास ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली. कलाविश्वात करीना आणि शाहिद यांचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. अगदी ही जोडी एकमेकांशी लवकरच लग्न करेल असंही म्हटलं जात होतं. मात्र, त्यांच्या नात्याच सगळं काही सुरळीत सुरु असतानाच अचानकपणे या दोघांचं ब्रेकअप झाला. पण शाहिद कपूरच्या आधीही करीना कपूर एक रिलेशनशीपमध्ये होती. 

 करीनाने हृतिक रोशनसोबत अनेक चित्रपट केले. 'कभी खुशी कभी गम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'यादीं' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यांची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडली.

करीना आणि हृतिक रोशन या जोडीने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. अशात दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याचीही चर्चा सुरू होती. करिना हृतिकसाठी वेडी झाली होती. प्रकरण इतके पुढे गेले होते की हृतिकच्या कुटुंबीयांना मध्ये पडून दोघांना वेगळं करावं लागलं होतं.

त्यावेळी करीनाने एका मुलाखतीत हृतिक रोशनसोबतच्या नात्याबाबत चर्चा केली होती. त्यावेळी अभिनेत्री रागात म्हणाली होती की, आता तिला अशाप्रकारच्या अफवांपासून ब्रेक हवा आहे. करिना म्हणाली होती की, ती कधीही कोणत्याही विवाहित पुरूषाच्या प्रेमात पडलेली नाही आणि ती कधीही विवाहित पुरूषासोबत अफेअर करणार नाही.

करीना असंही म्हणाली होती की, विवाहित पुरूष तिच्या करिअरसाठी हानिकारक आहेत. तिला आणि हृतिकला निर्माते, दिग्दर्शक साइन करतात कारण ते एक हॉट जोडी आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडते. करिना म्हणाली होती की, तिला चिंता आहे की, या अफवांचा प्रभाव हृतिक आणि सुझेनच्या वैवाहिक जीवनावर होऊ नये.

करीनाने हा खुलासा केल्यानंतर तिच्या आणि हृतिकच्या अफेअरच्या अफवा बंद झाल्या होत्या. त्यानंतर दोघांनी सोबत कामही केलं नाही. दावा केला जातो की, या अफवांमुळेच तिने हृतिकसोबत काम करणं बंद केलं होतं. 

टॅग्स :करिना कपूरशाहिद कपूर