Join us
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : पायाला बिलगली भिक मागणारी ती चिमुकली, बेबोने केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 15:06 IST

नाताळच्या दिवशी करिना तैमूरला घेऊन मुंबईच्या माऊंट मॅरी चर्चमध्ये पोहोचली. पण हे काय?

ठळक मुद्देआज करिनाचा ‘गुड न्यूज’ हा सिनेमा रिलीज झाला.

25 डिसेंबरला नाताळचा सण उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनीही नाताळ धुमधडाक्यात साजरा केला. करिना कपूरने नाताळनिमित्त खास पार्टी ठेवली. बॉलिवूडचे अनेक दिग्गज या पार्टीत एन्जॉय करताना दिसले. पार्टी साजरी केल्यानंतर नाताळच्या दिवशी करिना तैमूरला घेऊन मुंबईच्या माऊंट मॅरी चर्चमध्ये पोहोचली. पण हे काय? चर्चमधून परतत असताना करिनाने असे काही केले की, ती ट्रोल झाली.  सध्या करिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे करिना प्रचंड ट्रोल होतेय.

होय, करिना चर्चमधून बाहेर पडताना एक भिक मागणारी मुलगी तिच्या पायाला बिलगते. पण करिना तिच्याकडे ढुंकूनहीपाहत नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करत करिना पुढे जाते. एक महिला पोलिसही भिक मागणा-या त्या मुलीला करिनापासून दूर लोटताना दिसते. नेमक्या करिनाच्या या वागण्यानेच ती ट्रोल होतेय.

करिनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी तिला फैलावर घेतले. एवढी श्रीमंती असून एका गरिब मुलीला मदत करू शकत नाही, लाज वाटायला हवी, अशा शब्दांत अनेकांनी तिला सुनावले आहे. गरिब मुलीला करिनापासून दूर करणाºया महिला पोलिसालाही लोकांनी ट्रोल केले आहे.

करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास आज करिनाचा ‘गुड न्यूज’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात करिनाशिवाय अक्षय कुमार, दिलजीत दोसांज, कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :करिना कपूर