Join us

करिना कपूरने आई झाल्यानंतर शेअर केला पहिला सेल्फि, कॅप्शनने वेधलं सगळ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 16:59 IST

kareena kapoor khan first selfie after welcoming her second baby : करिना कपूर खान स्विमिंग पूलजवळ बसली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान काही दिवसांपूर्वीच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. करिनाने दुस-या पुत्ररत्नाला जन्म दिला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी परतल्यानंतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाली आहे.  तिने स्वत: चा फोटो शेअर करत पहिली पोस्ट शेअर केली.  तिने चाहत्यांना खूप मिस केले असे करीनाने लिहिले आहे.  

करिना कपूर खान स्विमिंग पूलजवळ बसली आहे आणि डोक्यावर टोपी घालून फोटोमध्ये पाऊट करताना दिसतेय. करीनाने हा फोटो आपल्या नवीन घरातून शेअर केला आहे. करिनाने आपल्या दुसऱ्या बाळाची झलक अजून मीडियाला दाखवलेली नाही. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फीन्सद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. परिणामी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या बघता, तूर्तास तरी मीडियासमोर न येण्याचा निर्णय करिना व सैफने घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ते आपल्या दुसºया मुलाची एक झलक चाहत्यांना दाखवू शकतात. रिपोर्टनुसार, दुसºया मुलाला जगासमोर आणण्याची जबाबदारी करिनाची असेल. लवकरच बेबो सोशल मीडियावर मुलाचा फोटो आणि त्याच्या नावाचा खुलासा करेल.

2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर बेबो व सैफने कॅमे-याला मस्तपैकी पोज दिल्या होत्या. प्रेग्नंसीदरम्यानही तिने फोटोशूट केले होते. मात्र यावेळी बेबोचा मूड पूर्णपणे वेगळा दिसला. 

टॅग्स :करिना कपूर