Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलांनी फिल्म स्टार बनू नये...! करिना कपूरची एकच इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 15:58 IST

मुलांबद्दल पहिल्यांदाच भरभरून बोलली बेबो, वाचा काय म्हणाली?

ठळक मुद्देतैमूर अगदी सैफसारखा आहे. तर जेह मात्र अगदी शांत आहे, असेही तिने सांगितले.

करिना कपूर (Kareena Kapoor) सध्या धाकटा मुलगा जहांगीर अली खान (Jehangir) याच्या नावावरून चर्चेत आहे. जहांगीरच्या जन्मानंतर करिनाने अनेक महिने त्याला जगापासून लपवून ठेवले होते. मात्र अलीकडे सर्वांना त्याची पाहिली झलक दिसली.  जहांगीर आपल्या आईबाबासोबत अजोबा रणधीर कपूरच्या घरी आला होता. त्यावेळी त्याचे फोटो, त्याची पहिली झलक मीडियाच्या कॅमेरात कैद झाली. आता करिनाने जहांगीर व तैमूर (Taimur ) या दोन्ही मुलांच्या करिअरबद्दल एक इच्छा व्यक्त केली आहे. माझ्या मुलांनी फिल्म स्टार बनू नये अशी माझी इच्छा आहे,असं ती म्हणाली.

नुकतीच करीनाने एचटी ब्रांचला एक मुलाखत दिली. यावेळी तिने आपल्या मुलांबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी करीना म्हणाली, ‘माझा लहान मुलगा जेह आत्ता सहा महिन्यांचा आहे आणि तो हुबेहुब माझ्यासारखा दिसतो. माझा मोठा मुलगा तैमूरला आता ब-याच गोष्टी समजू लागल्या आहेत. माझ्या दोन्ही मुलांनाही मी एक चांगली व्यक्ति बनवू इच्छिते. माझ्या मुलांनी अभिनेताचं व्हाव, अशी माझी इच्छा नाही.त्यांनी वेगळ्या क्षेत्रात आपलं नाव केलं तर मला खूप आवडेल.  मी माउंट एव्हरेस्ट चढू इच्छितो किंवा अन्य काही करू इच्छितो, असं तैमूर मला येऊन म्हणालाच तर आई म्हणून मला अधिक आनंद होईल. अर्थात करिअरचा निर्णय त्यांचा असेल. त्यांना जे काही करायचे त्यासाठी माझा त्यांना नेहमीच पाठींबा असेल.’

 जेह तैमूरपेक्षा वेगळा... जेह आणि तैमूर या दोघांमध्ये खूपच फरक आहे. तैमूरला जास्त चेहरे समोर असलेलं आवडत नव्हतं. तर जेहचं त्याच्या अगदी उलट आहे त्याला जास्त लोक समोर असलेलं आवडत. तसेच तैमुरला रंग, पेंटिंग, काहीतरी नवनवीन शोधण्यामध्ये रस आहे. तो अगदी सैफसारखा आहे. तर जेह मात्र अगदी शांत आहे, असेही तिने सांगितले.
टॅग्स :करिना कपूर