Join us
Daily Top 2Weekly Top 5

 करिना कपूर भडकली; म्हणे, मी बिकनी घालावी की नाही हे सांगणारा सैफ कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 11:12 IST

अनेकांनी करिनाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले होते. यापैकी एक कमेंट अरबाजने वाचली आणि बेबोची सटकली.

ठळक मुद्देलोकांनी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यावर बोलणे बंद केले पाहिजे. अखेर सेलिब्रिटीही माणसं आहेत. त्यांनाही भावभावना आहेत, असेही करिना म्हणाली.

 बेबो करिना कपूर मुलगा तैमूर व पती सैफसोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करून परतली. साहजिकच सोशल मीडियावर बेबोच्या या व्हॅकेशनचे फोटो व्हायरल झालेत. यातील एका फोटोत बेबो बिकनीत दिसली. मग काय, या बिकनी फोटोंवरून लोकांनी बेबोला ट्रोल करणे सुरू केले. तिला एकटीलाच नाही तर लोकांनी सैफलाही यावरून ट्रोल केले. तुझी बायको बिकनी घालते, तुला लाज वाटत नाही का? इथपर्यंत लोक बोलले. साहजिकचं बेबो संतापली. इतकी की, मी बिकनी घालावी की नाही, हे सांगणारा सैफ कोण? अशी प्रतिक्रिया तिने दिली.

नुकतीच अरबाज खानच्या ‘क्विक हिल पिंच’ या नव्या चॅट शोमध्ये करिना सहभागी झाली होती. या कार्यक्रमामध्ये करिनाला तिच्या फोटोंवरील लोकांच्या काही कमेन्ट्स वाचून दाखवण्यात आल्या. या कमेन्टसमध्ये अनेकांनी करिनाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले होते. यापैकी एक कमेंट अरबाजने वाचली आणि बेबोची सटकली.

तुझी बायको बिकनी घालते, तुला लाज वाटत नाही का?  असा प्रश्न या कमेंटमध्ये करण्यात आला होता. अरबाजने ही कमेन्ट वाचून दाखवताच बेबोच्या चेह-यावरचे भाव बदलले. ती कमालीची संतापली. ‘मी बिकीनी घालावी की नाही हे सांगणार सैफ कोण? तू बिकनी का घातली किंवा हे असे का केले, असे सैफ मला विचाले, असे आमचे नाते नाहीच. माझ्यामते, आम्हा दोघांचेही नाते प्रगल्भ आहे. त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी बिकनी घातली असेल तर त्यामागे नक्कीच कारण असणार,’असे करिना यावेळी म्हणाली. लोकांनी सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यावर बोलणे बंद केले पाहिजे. अखेर सेलिब्रिटीही माणसं आहेत. त्यांनाही भावभावना आहेत, असेही करिना म्हणाली.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान अरबाज खान