Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG ! करीना कपूरने चक्क दोनवेळा सैफ अली खानला दिला होता लग्नासाठी नकार, मग घडले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 19:38 IST

करीनाने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री करीना कपूर लवकरच अक्षय कुमारसोबत गुडन्यूज देणार आहे. त्यांचा आगामी सिनेमा गुडन्यूज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या करीना या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. जागरणच्या रिपोर्टनुसार करीनाने दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्या. रिपोर्टनुसार करीनाने सैफशी लग्न करण्यास नकार दिला होता. करीनाला सैफने ग्रीसमध्ये प्रपोज केले होते. मात्र तिने दोन वेळा सैफला नकार दिला. सैफने आधी ग्रीस मग लडाखमध्ये करीनाला प्रपोज केले होते. रिपोर्टनुसार मुलाखती दरम्यान म्हणाली करीना म्हणाली की, ''सैफ मला म्हणाला की मला असे वाटते की आपण आता लग्न करायला हवं. मला हे नाही माहिती कारण मी तुला अजून तेवढं ओळखंत नाही अशी काहीशी माझी प्रतिक्रिया होती. अर्थात यात माझा नकार नव्हता. याचा अर्थ असा होता की मला सैफला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे होता. सैफशी लग्न करणं हा माझ्या करिअरमधला सगळ्यात चांगला निर्णय होता.''   

बॉलिवूडची बेबो करीना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान सिनेसृष्टीतील पॉवर कपल मानलं जाते. हे पॉवर कपल कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या दोघांचं लग्न होऊन बराच काळ लोटला आहे. सोबतच त्यांचा मुलगा तैमुर आता सर्वांचाच लाडका झाला आहे. 

 

गुडन्यूज सिनेमात अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका आहे.  हा सिनेमा आयव्हीएफ टेक्नॉलजीवर आधारीत असून २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान