Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाह बेबो तुस्सी ग्रेट हो!, प्रेग्नेंट असूनही करिना कपूर करतेय खूप काम, फोटो शेअर करत म्हणाली- माझे योद्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 13:49 IST

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या तिच्या प्रेग्नेंसीला घेऊन चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री  करिना कपूर सध्या तिच्या प्रेग्नेंसीला घेऊन चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सैफ आणि करीनाने आपण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर फॅन्सनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. सैफ अली खानच्या बर्थडे पार्टीच्या फोटोंमध्ये करिनाचे बेबी बम्प दिसले होते. प्रेग्नेंसी दरम्यान करिना कपूर काम करते आहे. 

करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बेबो एका मेकअप रुममध्ये बसलेली दिसतेय. करिनासोबत तिचा मेकअप स्टाफसुद्धा मास्क लावून दिसतोय. या फोटोला करिना कपूरने एक कॅप्शन देताना लिहिले, आणखी 'एक दिवस, आणखी एक शूट, माझे योद्धा' यासोबत करिना #TheNewNormal असा हॅशटॅग दिला आहे. करिनाचा हा फोटो तिच्या फॅन्सना चांगलाच पसंत पडला आहे. 

करिना कपूरचा सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'चे अजून बरेच शूटिंग बाकी आहे. अशा परिस्थितीत 'लाल सिंग चड्ढा'ची शूटिंग दरम्यान करिना कपूर बेबी बम्पसोबत कशी करणार? हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार मेकर्सनी यांचा जुगाड केला आहे. करिनाचे बेबी बम्प लपवण्यासाठी मेकर्स वीएफएक्सचा उपयोग करणार आहे. करिना कपूरला अजून लाल सिंग चड्ढाचे 100 दिवसांचे शूटिंग बाकी आहे. सप्टेंबर किंंवा ऑक्टोबरमध्ये  करिना कपूर सिनेमाच्या टीमला ज्वॉईन करेल आणि तिच्या भागाची शूटिंग पूर्ण करणार आहे.  

टॅग्स :करिना कपूर