Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूर व सारा अली खानमध्ये का हा दुरावा? सोशल मीडियावर नवी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 14:40 IST

होय, करिना आणि तिची सावत्र लेक सारा अली खान यांच्यात सगळे काही ‘ऑल वेल’ नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगतेय.

ठळक मुद्देसाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूरने नुकताच इन्स्टाग्रामवर धमाकेदार डेब्यू केला आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. बघता बघता बेबोच्या फॉलोअर्सची सध्या 17 लाखांवर गेली. पण करिनाच्या इन्स्टा डेब्यूसोबतच एका नव्या वादाची चर्चा सुरु झाली. होय, करिना आणि तिची सावत्र लेक सारा अली खान यांच्यात सगळे काही ‘ऑल वेल’ नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगतेय.या चर्चेची सुरुवात झाली तीच मुळात करिनाच्या इन्स्टा डेब्यूपासून. होय, करिनाने इन्स्टा डेब्यू केल्याकेल्या बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला फॉलो केले.

अगदी करिश्मा कपूर, सोहा अली खान, सोनम कपूर, मलायका अरोरा, आलिया भट इथपासून अनेकांनी. पण सारा अली खान मात्र या यादीत दिसली नाही. करिनानेही तिला फॉलो करण्याचे कष्ट घेतले नाहीत. मग काय, करिनाच्या फॉलोअर्समध्ये सारा अली खानचे नाव नाही हे पाहून, दोघींमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु झाली. आता या चर्चेत तथ्य किती, हे आम्हाला ठाऊक नाही. करिना व सारा यावर बोलतात का ते बघूच.

सारा अली खानची आई अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने २०१२ साली बॉलिवूडची बेबो करीना कपूरशी लग्न केले. अगदी तेव्हापासून सारा व करिनाच्या नात्याविषयीच्या चर्चा आहेत. करिनाच्या इन्स्टा डेब्यूसह या चर्चांमध्ये भर पडलीय, इतकेच.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. यात ती वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. करिनाचे म्हणाल तर तिचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात ती अभिनेता इरफान खानसोबत दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानकरिना कपूर