Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ व करिना काय म्हणून ही जाहिरात केली? नेटक-यांनी उडवली खिल्ली, कमेंट्स वाचाल तर पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 12:44 IST

होय, करिना व सैफ ही जाहिरात करण्यासाठी तयारच कसे झालेत? असा प्रश्न जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांना पडला.

ठळक मुद्देया जाहिरातीवर नेटक-यांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

सैफ अली खान व करिना कपूर यांची एक जाहिरात सध्या जाम चर्चेत आहेत. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांनी सैफिनाची जोरदार खिल्ली उडवणे सुरु केले. होय, करिना व सैफ ही जाहिरात करण्यासाठी तयारच कसे झालेत? असा प्रश्न जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांना पडला. जगातील सगळ्यात मजेशीर जाहिरात म्हणून लोकांनी यावरून सैफ व करिनाची चांगलीच मजा घेतली. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.

तर ही जाहिरात आहे एका पाण्याच्या टाकीची. जाहिरातील सैफ व करिना डायनिंग टेबलवर आहेत.  ‘खूप दिवस झालेत आपण मोठ्या पडद्यावर एकत्र कामच केले नाही,’ असे सैफ करिनाला म्हणतो. यावर ‘घर पे भी रोमान्स, बाहर भी रोमान्स,’ असे करिना त्याला म्हणते. यावर सैफ तिला आपण एका पाण्याच्या टाकीच्या जाहिरातीत काम केले पाहिजे, असे सुचवतो. दोघांचे एकमत होते आणि इथेच जाहिरात संपते. 

या जाहिरातीवर नेटक-यांनी एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्स वाचून तुम्हीही पोट धरून हसाल, इतक्या त्या मजेशीर आहेत. ‘अब तैमूर इसी पानी की टंकी में स्विम करेगा और इसके फायदे बतायेगा,’ असे एका युजरने यावर लिहिले.एकाने तर ‘जगातील सर्वात महान पाण्याच्या टाकीची जाहिरात,’म्हणून सैफ व करिनाची खिल्ली उडवली. एका युजरने काय एक वेगळाच तर्क काढला. ‘या लोकांची ब्रँड व्हॅल्यू इतकी घसरली की हा ब्रँड इतका मोठा झाला की त्याने या दोघांना एकत्र साइन केले. माझ्यामते, पहिला अंदाज योग्य आहे,’ असे या युजरने लिहिले.

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर