पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे (Pahalgam Terrorist Attack) देशातील प्रत्येक नागरिक संतापलेला आहे आणि ते या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत. दुसरीकडे करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ने असे काही केले आहे ज्यामुळे लोक संतापले आहेत आणि ते अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, देशात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती आणि फवाद खानच्या 'अबीर गुलाल'वरही बंदी घालण्यात आली होती, परंतु करीना एका पाकिस्तानी डिझायनरसोबत पोज देताना आणि डिनर करताना दिसली.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर करीना पाकिस्तानी डिझायनर आणि मित्र फराज मननला भेटताना दिसली. २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता, ज्यामध्ये २८ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. कलाकारांपासून ते राजकारणी आणि सामान्य जनतेपर्यंत सर्वांनी या घटनेवर संताप आणि दुःख व्यक्त केले. त्यात करीना कपूर देखील होती.पण अवघ्या पाच दिवसांनी ती पाकिस्तानी डिझायनर फराज मन्नानसोबत पोज देताना दिसली. दोघांनीही एकत्र जेवणही केले. हे फोटो समोर आल्यानंतर नेटकरी संतापले.
पाकिस्तानी डिझायनरसोबतचे अभिनेत्रीचे फोटो आले समोर
२७ एप्रिल रोजी करीना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. ती दुबईला जात होती. याआधी ती एका ब्रँडच्या कार्यक्रमासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होती. पण फराज मननसोबतच्या तिच्या भेटीमुळे लोक नाराज झाले. करीनाने यापूर्वी फराज मन्नानसोबत काम केले आहे, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी डिझायनरसोबतच्या तिच्या भेटीमुळे लोकांचे रक्त खवळले आहे.
लोकांनी बेबोला म्हटलं देशद्रोही...सोशल मीडियावर काही जण करीनाला 'देशद्रोही' म्हणत आहेत तर काही जण तिला वाईट बोलत आहेत. फराज मननने इन्स्टाग्राम स्टोरीवर करीनासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, जो काही वेळातच व्हायरल झाला. हा फोटो शेअर करताना एका युजरने X अकाउंटवर लिहिले आहे की, 'भारत पाकिस्तानसोबत युद्धात अडकलेला असताना, करीना दुबईमध्ये पाकिस्तानी डिझायनर फराज मननसोबत फोटोशूट करण्यात व्यग्र आहे. तिने यापूर्वीही त्याच्यासोबत अनेक वेळा काम केले आहे. देशासाठी बलिदान देणे ही फक्त सैन्याची जबाबदारी आहे का? बॉलिवूड सेलिब्रिटींना त्यांच्या देशाप्रती काही कर्तव्य नाही का?' एका युजरने लिहिले, 'ती पूर्णपणे वेडी आहे. तिच्यासाठी देश महत्त्वाचा नाही, प्रसिद्धीच सर्वस्व आहे.' दुसऱ्याने लिहिले, 'कपूर कुटुंब नेहमीच देशद्रोही राहिले आहे.' आणखी एकाने लिहिले, 'ती कपूर कुटुंबाच्या नावावरचा डाग आहे.'