Join us
Daily Top 2Weekly Top 5

दरवेळी मुलींनाच का विचारले जातात असे प्रश्न ? करिना कपूर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:00 IST

योगायोग म्हणजे 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाच्या शूटिंग दरम्यानही करिना प्रेग्नेंट होती आणि तैमूरच्या जन्मानंतर तिने सिनेमाची शूटिंग केली होती. या सिनेमाच्या सीक्वलपूर्वी करिना कपूर पुन्हा प्रेग्नेंट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ब्युटी विथ ब्रेन अक्टर म्हणून ओळखली जाते. नुकताच तिचा  एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर समाजात घडणा-या गोष्टींवर आपला राग व्यक्त करतानाच दिसत आहे. त्याचबरोबर ती तिच्या हक्कांबद्दल बोलतानाही दिसत आहे. करीना कपूरचा हा व्हिडिओ बॉलिवूड व्हायरलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये  समाजावर तिथे प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे. " आधी खूप आभ्यास करा, आभ्यास करता करता चष्मा लागलाच तर चश्मिश म्हणून चिडवले जाते. लिपस्टिक लावली तर  हिरोईन म्हणून चिडवतात.  चारित्र्यावर शंका उपस्थित करू नये म्हणून इतरांच्या भीतीपोटी लवकर घरी या. पण या सगळ्यांमध्ये माझा जगण्याचा हक्क कुठे आहे. 

 सैफशी लग्न झाल्यानंतर लाईफ बदलली नसल्याचं बेबोने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. लग्नाधी लग्न कधी करणार, लग्न झाल्यानंतर आई बनण्याबाबत विचारल्या जाणा-या प्रश्नानं बेबो अर्थात करिना कपूर चांगलीच वैतागली होती. स्त्रीसाठी आई बनणं एवढंच काही नसतं असा सवाल तिनं हा प्रश्न विचारणा-यांना केला होता.

सैफशी लग्न झाल्यानंतर लाईफ बदलली नसल्याचं बेबो सांगते.. समाज काय म्हणेल याच्याच अवतीभोवती आपण फिरतो. बदल होतोय पण फार कमी प्रमाणात सतत मुलींना नको ते प्रश्न विचारणे बंद होतील  तेव्हाच समाज खरा बदल घडेल. शेवटी चेंज इज व्हेरी ब्युटीफुल.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, सिनेमाचा सीक्वल ‘वीरे दी वेडिंग’च्या कलाकारांनाच घेऊन तयार करण्यात येणार आहे. यासाठी निर्मात्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल, कारण करिना कपूर प्रेग्नेंट आहे. डिलेव्हरीनंतर करीना कपूर खान सीक्वलच्या शूटिंगला सुरुवात करु शकते असा अंदाज आहे. करीना कपूर खान जेव्हा वेळ देण्यास तयार असेल, तेव्हा या चित्रपटाचे शूटिंग सुरू करता येईल.

योगायोग म्हणजे 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाच्या शूटिंग दरम्यानही करिना प्रेग्नेंट होती आणि तैमूरच्या जन्मानंतर तिने सिनेमाची शूटिंग केली होती. या सिनेमाच्या सीक्वलपूर्वी करिना कपूर पुन्हा प्रेग्नेंट आहे. काही दिवसांपूर्वीच करिना 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग पूर्ण करुन दिल्लीवरुन मुंबईत परतली आहे. या सिनेमात करिना आणि आमिर खानची मुख्य भूमिका असणार आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान