Join us

करीना कपूरने चक्क अजय देवगणला या कारणामुळे किस करण्यास दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:01 IST

अजय देवगण आणि करीना कपूर खान या दोघांनी बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान या दोघांनी बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र तुम्हाला माहित आहे का एका चित्रपटात करीनाने अजय देवगणला किस करण्यासाठी नकार दिला होता. 

२०१३ साली प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा दिग्दर्शित 'सत्याग्रह' चित्रपटात अजय देवगण आणि करीना कपूरने एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. चित्रपटातील 'रस के भरे तोरे नैन सांवरिया' या गाण्यात दोघांचा इंटिमेट सीन होणार होता. तर गाण्यामध्ये अजय आणि करीनाला लिपलॉक सीन देखील शूट करायचा होता. पण किसिंग सीन करण्यास करीनाने नकार दिला. 

सत्याग्रह चित्रपटाच्या आधी रिलीज झालेल्या ओमकारा चित्रपटात करीना आणि अजयने इंटिमेट सीन दिले होते. 'सत्याग्रह' चित्रपटात इंटिमेट सीन देण्यास नकार देण्यामागे एक कारण होते. मीडिया रिपोर्टनुसार, प्रकाश झा यांना चित्रपटात किसिंग सीन हवा होता. मात्र सैफसोबत लग्नामुळे तिने किसिंग सीन देण्यास नकार दिला. 

करीना कपूरच्या एका सहकलाकाराने सांगितले की, 'असे कधी झाले नाही की करीना कपूरने कधी बोल्ड सीन केले नाहीत. स्क्रिप्टच्या गरजेनुसार तिने सर्व सीन केले. पण प्रत्येकाला स्वतःसाठी निर्णय घेण्याचा अधिकार असतो. करीनाने लग्नानंतर हा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे तिच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले.  

टॅग्स :करिना कपूरअजय देवगण