Join us
Daily Top 2Weekly Top 5

​करिना कपूर संतापली; म्हणे, तैमूरचे नाव बदलण्याचा प्रश्नच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 14:16 IST

बेगम करिना कपूर खान हिचा लाडका मुलगा तैमूर अली खान याच्या नावावरून झालेली कॉन्टोवर्सी तुम्हाला आठवत असेलच. पण करिनाने ...

बेगम करिना कपूर खान हिचा लाडका मुलगा तैमूर अली खान याच्या नावावरून झालेली कॉन्टोवर्सी तुम्हाला आठवत असेलच. पण करिनाने तैमूरच्या नावावर टीका करणाºयांना भीक घातली नाही. अर्थात मध्यंतरी पापा सैफ अली खान याने मात्र गरज भासल्यास तैमूरचे नाव बदलण्याची तयारी दाखवली होती. पण कदाचित करिनाला हे अजिबात मान्य नाही.अलीकडे एका अवार्ड शोमध्ये तैमूरच्या नावावरून करिनाला छेडले गेले. तैमूरचे नाव बदलणार का? असे तिला विचारले गेले. या प्रश्नाने करिना लालबुंद झाली. खरे तर याआधी करिनाला तैमूरच्या नावाबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. पण यावेळी करिनाचा चेहरा बघण्यासारखा होता. अक्षरश: रागाने फणफणत, तैमूरचे नाव बदलण्याबद्दलच्या सगळ्या बातम्या बकवास असल्याचे करिनाने सांगितले. तैमूरचे नाव बदलेले नाही.ते तैमूर अली खान असेच आहे. तैमूर हे नाव बदलण्याची आमची कुठलीही योजना नाही, असे तिने एका दमात सांगून टाकले.मागील वर्षी २० डिसेंबरला करिना कपूरने सैफच्या मुलाला मुंबईतील ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला होता. त्यांनी आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले होते. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर काही लोकांनी तैमूर या नावावर आक्षेप नोंदविला होता. करिना कपूर व सैफ अली खान यांच्या मुलाचे नाव सैफिना किंवा ऐतिहासिक असेल,असे करिना कपूर बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच सांगत होती. दरम्यान सैफ व करिना यांना मुलगा झाल्यावर त्याचे नाव तैमूर असे ठेवण्यात आले, मात्र हे नाव त्याच्या चाहत्यांना आवडले नाही व त्यांनी टीकेची झोड उठविली. तैमूर या नावावर टीका करणारे १४ व्या शतकातील मुस्लिम सम्राट तैमूरलंग याचा दाखला देत होते. तैमूरलंग याने आपल्या साम्राज्य विस्तारासाठी अनेक देशावर विजय प्राप्त केला. यासाठी त्याने अनेक लोकांच्या कत्तली केल्या, त्याला शत्रूंचे शीर कापून त्याचा ढीग रचण्यात आनंद मिळत होता असे सांगण्यात येते. यामुळेच सैफने आपल्या मुलाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले गेले होते.