Join us

इरफानच्या 'अंग्रेजी मीडियम'मधला करिना कपूरचा फर्स्ट लूक आऊट, बेबो दिसली स्टनिंग अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 12:32 IST

करिना कपूर लवकरच इरफान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये दोघे एकत्र झळकणार आहेत.

ठळक मुद्दे'अंग्रेजी मीडियम'मधला करिनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे

करिना कपूर लवकरच इरफान खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये दोघे एकत्र झळकणार आहेत. करिनाने काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. 'अंग्रेजी मीडियम'मधला करिनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी करिनाचा या सिनेमातील लूक शेअर केला आहे. डार्क जीन्स आणि शर्टमध्ये करिना खूपच स्टनिंग दिसतेय. 

करिना कपूर यात एक महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने याआधी अशी भूमिका कधी साकारलेली नाही. पहिल्यांदा करीना आणि इरफान एकत्र काम करताना दिसणार आहेत. एका मुलाखाती दरम्यान करिनाने आपल्या भूमिकेबाबत बोलताना सांगितले होते की, ''अंग्रेजी मीडियममध्ये माझी भूमिका खूपच वेगळी आहे. हा एक वेगळा अनुभव असणार आहे. माझी भूमिका यात लहान  आहे पण इंटरेस्टिंग आहे. मला माझ्या कंम्फर्ट झोनच्या बाहेरच्या भूमिका करायच्या आहेत.''    

अंग्रेजी मीडियम सिनेमात मिठाई व्यापारी चंपकजीच्या भूमिकेत इरफान दिसणार आहे. अंग्रेजी मीडियम सिनेमाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत. या चित्रपटात इरफानसोबत दीपक डोबरियाल व राधिका मदन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

२०१७ मध्ये इरफानचा ‘हिंदी मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या चित्रपटाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. चीनमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे लगेच मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु केली होती.

टॅग्स :करिना कपूरइरफान खान