Join us

सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत असं काय घडलं की, करीना कपूरच्या डोळ्यात पाणी आलं? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:29 IST

करीना कपूरचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून करीनासोबत नेमकं काय घडलं, असा प्रश्न सर्वांना पडलाय

बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर (kareena kapoor) ही सर्वांची आवडती अभिनेत्री. करीनाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. २०२४ च्या डिसेंबर महिन्यात आलेल्या 'सिंघम अगेन' सिनेमातून करीनाने सर्वांचं मन जिंकलं. करीना कपूर नुकतीच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. करीना नुकतीच तिची खास मैत्रीण आणि अभिनेत्री सोनम कपूरच्या प्री बर्थडे पार्टीला सहभागी झाली होती. परंतु या पार्टीत करीना रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

करीना कपूर खरंच रडली?

झालं असं की, सोनम कपूरने तिचा ४० वा बर्थडे तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. करीना कपूरही या पार्टीत सहभागी झाली होती. परंतु करीनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कारमध्ये बसून करीना रडताना दिसतोय. करीना तिच्या गाडीत बसली असून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसतंय. करीना एका हाताने डोळे पुसत असल्याने, हा व्हिडीओ पाहून करीनाचे सर्व चाहते हैराणा झाले आहेत. सोनम कपूरच्या बर्थडे पार्टीत असं काय घडलं की, करीना भावुक झाली यातता सर्वजण अंदाज लावत आहेत.  

 

चाहत्यांनी कमेंट करुन काय सांगितलं?

करीनाच्या या व्हिडीओवर लोकांनी मात्र मजेशीर कमेंट केल्या आहेत. करीनाचा रडतानाचा व्हिडीओ बघून लोकांनी कमेंट केल्या आहेत की, "सैफ ओरडला असेल", "ती सुद्धा एक माणूसच आहे. कोणतेही अंदाज न लावता तिला तिच्या भावना व्यक्त करु द्या", "ती कायम सुंदर दिसते, परंतु यावेळी ती भावुक दिसतेय",  अशा कमेंट करत काही लोकांनी करीनाची गंमत केलीय तर काहींनी काळजी व्यक्त केली आहे. आता करीना इतकी भावुक कशामुळे झाली, यामागचं कारण मात्र कळू शकलं नाही. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, मेघना गुलजारच्या आगामी सिनेमात ती झळकणार आहे.

टॅग्स :सोनम कपूरकरिना कपूरबॉलिवूड