Join us

'लाल सिंग चड्ढा'मध्ये नाही दिसणार करिना कपूरचे बेबी बम्प, मेकर्सने केला जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 17:55 IST

करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे.

करिना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसी दरम्यान करीना कपूर कामातून ब्रेक घ्यायच्या मूडमध्ये नाही आहे. प्रग्नेंसी दरम्यान करिना कपूर सतत काम करते आहे. करिना कपूरचा सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'चे अजून बरेच शूटिंग बाकी आहे. अशा परिस्थितीत 'लाल सिंग चड्ढा'ची शूटिंग दरम्यान करिना कपूर बेबी बम्पसोबत कशी करणार? हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार मेकर्सनी यांचा जुगाड केला आहे. करिनाचे बेबी बम्प लपवण्यासाठी मेकर्स वीएफएक्सचा उपयोग करणार आहे. करिना कपूरला अजून लाल सिंग चड्ढाचे 100 दिवसांचे शूटिंग बाकी आहे. सप्टेंबर किंंवा ऑक्टोबरमध्ये  करिना कपूर सिनेमाच्या टीमला ज्वॉईन करेल आणि तिच्या भागाची शूटिंग पू्र्ण करेल. 

 'लाल सिंग चड्ढा’ आहे  हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.

टॅग्स :करिना कपूरआमिर खान