Join us

करीना कपूर व अर्जुन कपूर झळकणार ‘ह्या’ सिनेमाच्या सिक्वेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 07:15 IST

अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

ठळक मुद्देअनुराग बासूने लिहिली सिक्वलची पटकथा ‘लाइफ इन अ मेट्रो’ सिक्वलसाठी कलाकारांची झाली निवडकलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर व इश्कजादे अभिनेता अर्जुन कपूर या दोघांनी ‘की अॅण्ड का’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. तसेच हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ‘लाइफ इन अ मेट्रो’ या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये हे दोघे दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

अनुराग बासू दिग्दर्शित ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट जवळपास अकरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चार शहरांतील चार  कथा असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही चित्रपटाची प्रशंसा केली होती. आता त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी कलाकारांचीही निवड झाली आहे. ‘डीएनए’च्या रिपोर्टनुसार, अनुरागने स्वत: या सिक्वलची पटकथा लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही वेगवेगळ्या कथा असून त्यातील एकामध्ये करिना तर दुसऱ्या कथेत अर्जुन भूमिका साकारणार आहे. ‘लाइफ इन अ मेट्रो’मधील गाणीसुद्धा विशेष गाजली होती. त्यामुळे संगीत दिग्दर्शक प्रीतमची साथ सिक्वलसाठीही मिळणार असल्याचे समजते आहे.करीना आणि अर्जुनला सध्या बऱ्याच चित्रपटांचे ऑफर्स येत आहेत. करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ या बिग बजेट चित्रपटातही करिना झळकणार आहे. तर अर्जुनच्या हातात चित्रपटांची यादीच आहे. राजकुमार गुप्ता यांचा ‘इंडियाज मोस्ट वाँटेड’, आशुतोष गोवारिकर यांचा ‘पानिपत’, विपुल शाहचा ‘नमस्ते इंग्लंड’ आणि दिबाकर बॅनर्जीचा ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटांत अर्जुन भूमिका साकारणार आहे. 

‘लाइफ इन अ मेट्रो’  या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये करीना व अर्जुन व्यतिरिक्त आणखीन कोण कलाकार असणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :करिना कपूरअर्जुन कपूर