Join us

प्रेग्नेंसीच्या शेवटच्या महिन्यातही काम करतेय करीना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 14:26 IST

करीना कपूर दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे.

बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर दुसरी प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. यादरम्यान तिने आपल्या कामाला ब्रेक दिलेला नाही. करीनाने सोमवारी इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या टीमसोबतचा नवीन फोटो शेअर केला. ज्यात तिने इंटरेस्टिंग कॅप्शन लिहिले.

करीना कपूरने फोटो शेअर करत लिहिले की, वॉन्टिंग टू पॉप..! माझे सर्व प्रिय लोक..तुमच्या सगळ्यांसोबत राहून मी खूश आहे. यावेळी करीना शिमर पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिच्यासोबत कॉश्च्युम डिझायनर मिक्की कॉन्ट्रॅक्टर, तिची मॅनेजर पूनम दमानिया, हेअर स्टायलिस्ट यियानी त्सापेटोरी आणि इतर लोक उपस्थित होते. 

आपल्या प्रेग्नेंसीदरम्यान करीना काम करते आहे. याबद्दल तिने बॉम्बे टाइम्सला सांगितले की, नाही, मी कधीच प्लानिंग करत नाही की मला हे करायचे किंवा ते. इथे फक्त ही गोष्ट आहे की तशी व्यक्ती नाही जी घरी बसून हे म्हणेल की आता मी काहीच करणार नाही. मी तेच करते जे मला करायचे आहे. अशात काम करणे योग्य नाही मग ते गर्भावस्थेदरम्यान किंवा बाळाला जन्म दिल्यानंतर हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. कोणी सांगितले आहे की गरोदर महिला काम करू शकत नाही? वास्तविकतेत तुम्ही जितके सक्रीय होतात बाळ तितकेच स्वस्थ होते आणि आई सर्वात जास्त आनंदी राहते. प्रसूतीनंतर जेव्हा तुम्ही फिट असल्याचे समजतात तेव्हा तुम्हाला तेच केले पाहिजे जे तुम्हाला करायला चांगले वाटते आणि मुलांना वेळ देण्यासोबत तुमचे काम आणि स्वतःमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करा. मला नेहमीच एक कामकाज करणारी आई असण्याचा अभिमान वाटतो.

आपल्या दुसऱ्या गर्भावस्थेवेळी ती सुट्टीवर गेली आणि कामदेखील करते आहे. ती आणि तैमूर धर्मशालामध्ये गेले होते जिथे सैफ अली खानचे भूत पोलीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या ट्रिपदरम्यान तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पहायला मिळाले होते.

करीनाने सणदेखील कुटुंबासोबत साजरे केले. ख्रिसमसच्या दिवशी ती सर्वांसोबत डिनर करताना दिसली होती. ख्रिसमसचे फोटोदेखील समोर आले होते. 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान तैमुर