करिनाला ‘बिग बीं’चा बुके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 17:18 IST
महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील चांगल्या कलाकारांची प्रशंसा करताना कधीही थकत नाही. नव्या लोकांचे कौतुक करताना त्यांना जराही कमीपणा ...
करिनाला ‘बिग बीं’चा बुके
महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील चांगल्या कलाकारांची प्रशंसा करताना कधीही थकत नाही. नव्या लोकांचे कौतुक करताना त्यांना जराही कमीपणा वाटत नाही. म्हणूनच ‘क्वीन’ पाहून अमिताभ यांनी कंगनाला बुके व स्वहस्ताक्षरातील शुभेच्छा लिहून पाठवला. त्यानंतर अलीकडे ‘बाजीराव मस्तानी’मधील रणवीर सिंह याचा अभिनय पाहूनही बिग बी भारावून गेले. रणवीरचेही त्यांनी बुके व स्वहस्ताक्षरातील शुभेच्छा संदेश पाठवून कौतुक केले. आता अमिताभ यांनी करिनाचेही असेच कौतुक केले आहे. करिनाचा ‘की अॅण्ड का’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. अमिताभ यांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली. यातील करिनाने साकारलेली करिअरिस्ट वूमेन पाहून अमिताभ यांना तिचे कौतुक वाटते. मग काय, बेबोला कौतुकाची थाप तर द्यायला हवी ना! सकाळी सकाळी करिनाच्या घरी अमिताभ यांचा बुके आणि स्वहस्ताक्षरातील शुभेच्छा संदेश पोहोचला. हे कौतुक बघून बेबोला अक्षरश: गहिवरून आले. तिचा आनंद गगणात मावेनासा झाला...शेवटी बॉलिवूडच्या मेगास्टारकडून मिळालेली पावती, म्हणजे काय,गंमत नाही...होय ना!!!