Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तैमूरसाठी करिना व सैफने केलेय ‘हे’ खास प्लानिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 15:33 IST

करिना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या तैमूरच्या संगोपनात बिझी आहेत. तैमूरला अधिकाधिक वेळ कसा देता येईल, दोघांपैकी ...

करिना कपूर खान आणि सैफ अली खान सध्या तैमूरच्या संगोपनात बिझी आहेत. तैमूरला अधिकाधिक वेळ कसा देता येईल, दोघांपैकी किमान एकजण त्याच्याजवळ कसा  राहिल,यासाठी करिना व सैफ दोघांचीही तारेवरची कसरत सुरु आहे.नुकताच सैफने ‘रंगून’ हातावेगळा केला. त्यामुळे सध्या सैफ त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीत गुंतला आहे. सैफ बिझी असताना तैमूरची सगळी जबाबदारी करिनाने एकटीने सांभाळली. पण आता सैफ आणि करिना दोघेही येत्या दोन महिन्यात आपआपल्या कामात बिझी होणार आहेत. त्यामुळे तैमूरला सांभाळायचे तर परफेक्ट प्लानिंग करावी लागणारच.मे महिन्यापासून करिना कपूर ‘वीरे दी वेडिंग’च्या शूटींगमध्ये बिझी होणार आहे. तत्पूर्वी सैफला ‘शेफ’चे शूटींग संपवावे लागणार आहे. तरच तैमूरजवळ दोघांपैकी कुणी एक असणार आहे. खास यासाठीच करिना व सैफ दोघेही अगदी प्लानिंगने शूटींग डेट्स मॅनेज करताना दिसत आहेत. सैफिना किती परफेक्ट पालक आहेत, हे यावरून तुम्हाला कळले असेलच. पण शेवटी या दोघांना जोडणारा सामाईक धागा तैमूर हाच आहे. तैमूर आल्याने माझे व करिनाचे नाते अधिक घट्ट व प्रगल्भ झालेय, असे अलीकडे सैफ म्हणाला होता.आक्टोबर २००७ मध्ये करिना व सैफ यांची प्रेमकहाणी सुरु झाली होती. २०१२ मध्ये दोघांनीही लग्न केले. करिना व सैफ या दोघांच्या वयात किमान दहा वर्षांचे अंतर आहे. कदाचित यामुळे नात्यांची विण घट्ट कशी ठेवायची, हे सैफला चांगलेच ठाऊक आहे. परस्परांवर विश्वास आणि परस्परांचा विश्वास व प्रेम हेच करिना व सैफच्या यशस्वी वैवाहिक आयुष्याचे गमक आहे.