बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहे जे खूप साधारण कुटुंबातील आहेत आणि सिनेइंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. मात्र असे काही कलाकार आहेत जे खूप श्रीमंत आहेत, मात्र त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्यावर यश संपादन केले आहे. या कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे सैफ अली खान. त्याने बरेच हिट चित्रपट दिले आहेत आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूरदेखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघेही लक्झरी आयुष्य जगतात. त्यांचे पतौडी पॅलेस खूप आलिशान आहे.
खरेतर सैफ अली खान बॉलिवूडचा एक मात्र अभिनेता आहे ज्याच्या नावावर आलिशान महल आहे. एका मुलाखतीत सैफने सांगितले की, या महलसाठी त्याला खूप मोठी रक्कम मोजावी लागली होती. त्याने सांगितले होते की, त्याचे वडील मंसूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर हे पॅलेस भाड्याने दिले होते. मात्र ते परत मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठी रक्कम द्यावी लागली होती.
मात्र तुम्हाला माहित नसेल की १९०० सालच्या सुरूवातीली रसेलने पतौडी पॅलेस डिझाइन केले होते.
या पॅलेसमध्ये मोठे मोठे काही ग्राउंड, गॅरेज, घोड्यांचे तबेले आहेत. सोबतच कित्येक महागडे पेटिंग्स, वस्तू आणि अँटिक गोष्टी आहेत.