करण म्हणतो,‘बिप्स म्हणजे गुलाबी परी!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 09:22 IST
करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु हे एकमेकांच्या सहवासात आयुष्य व्यतीत करण्यासाठी आता तयार झाले आहेत. ‘मेड फॉर इच अदर’ ...
करण म्हणतो,‘बिप्स म्हणजे गुलाबी परी!’
करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु हे एकमेकांच्या सहवासात आयुष्य व्यतीत करण्यासाठी आता तयार झाले आहेत. ‘मेड फॉर इच अदर’ जोडी करण-बिप्स यांनी नुकतीच मेहंदी सोहळ्यात प्रचंड धम्माल केली.फोटो, व्हिडीओ, डान्स, सेल्फीज, पिंक ड्रेसिंगमधील बिप्स अतिशय गोड दिसत होती. काल करणने कबूल केले की, ‘बिपाशा म्हणजे माझं स्वप्न. माझ्यासाठी आनंदाची तिजोरी.’ करणने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.करणने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता तर बिप्सने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तो म्हणतो,‘ यु आर अ ड्रीम कम ट्रु..बिपाशा बासु, माय क्रेझी बंडल आॅफ जॉय.’ बिपाशा तिच्या खार येथील घरात कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यासमवेत करणसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.बिपाशाचे हे पहिलेच लग्न असून याअगोदर ती जॉन अब्राहमला डेट करत होती. तर करणसिंगचे हे तिसरे लग्न आहे. याअगोदर त्याने श्रद्धा निगम आणि नंजर जेनिफर विंगेट यांच्यासोबत लग्न केले आहे.