करण जोहरला करायचे होते ‘दंगल’चे डायरेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 22:22 IST
जगभरात धूम उडवून देणाºया आणि कमाईचे कित्येक रेकॉर्ड नावावर करणाºया ‘दंगल’ या सिनेमाचे करण जोहरला दिग्दर्शन करायचे होते. करणने ...
करण जोहरला करायचे होते ‘दंगल’चे डायरेक्शन
जगभरात धूम उडवून देणाºया आणि कमाईचे कित्येक रेकॉर्ड नावावर करणाºया ‘दंगल’ या सिनेमाचे करण जोहरला दिग्दर्शन करायचे होते. करणने त्याची ही इच्छा ट्विटरवर व्यक्त केली असून, त्यामागे करणचा नेमका हेतु काय? हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. खरं तर करण सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतो. ट्विटरवर जेव्हा त्याच्या फॅन्सने त्याला ‘तू बघितलेला अखेरचा असा कोणता सिनेमा आहे, ज्याचे तुला दिग्दर्शन करावेसे वाटले’ असे विचारले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता ‘दंगल’ सिनेमाचे नाव पुढे केले. ‘कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन करणाºया करण जोहरचे नाव बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांमध्ये घेतले जाते. बॉलिवूडमधील त्याचे योगदान कौतुकास्पद असून, त्याने व्यक्त केलेली इच्छा त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारी आहे. कारण ‘दंगल’ या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच कमाईच्या बाबतीतही आघाडी घेतली आहे. मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दंगल’ हा सिनेमा बायोपिक असून, हरियाणाच्या फोगट कुटुंबावर आधारित आहे. या सिनेमाने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरदेखील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यामुळे अशा सिनेमाच्या दिग्दर्शनाची करणने इच्छा व्यक्त करणे स्वाभाविक समजले जात आहे. ट्विटरवर त्याला त्याच्या फेव्हरेट सिनेमाविषयी यावेळी विचारण्यात आले. त्याने ‘माय नेम इज खान’ हा माझा फेव्हरेट सिनेमा असल्याचे म्हटले आहे. }}}}