Join us

करण जोहर दाखवणार का ‘ईद’ला चित्रपट रिलीज करण्याचे धाडस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 20:27 IST

दिग्दर्शक करण जोहरने मध्यंतरी अनेक  संकटांना समर्थपणे तोंड दिले. ‘ऐ दिल है मुश्किल’पासून सुरू झालेले वादाचे चक्र पुढे त्याच्या ...

दिग्दर्शक करण जोहरने मध्यंतरी अनेक  संकटांना समर्थपणे तोंड दिले. ‘ऐ दिल है मुश्किल’पासून सुरू झालेले वादाचे चक्र पुढे त्याच्या आत्मकथेच्या प्रकाशनापर्यंत सुरू राहिले. त्यामुळे करण आणि पंगा एक समीकरणच बनले. अजय देवगणसारख्या मोठ्या स्टारच्या चित्रपटासोबत स्वत:चा चित्रपट प्रदर्शित करण्याची हिंमत करणारा करण सलमान खानसोबत अशी टक्कर घेणार का?या प्रश्नाचे उत्तर तो देतो - कधीच नाही.नुकतेच त्याने निर्मिती केलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘ईदच्या काळात मी कधीच चित्रपट रिलीज करणार नाही. कारण गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता ‘ईद’ सलमानच्या चित्रपटासाठी जणू काही राखीवच आहे. त्यामुळे या काळात चित्रपट रिलीज करून कोणताच निर्माता सलमानशी पंगा घेणार नाही.’ ALSO READ: 'ब्रदीनाथ की दुल्हनिया'चा ट्रेलर लाँचपण याचा अर्थ असा नाही की, करण ईदला कधी चित्रपट रिलीज करणार नाही. त्याने स्वत: यातून एक मधला मार्ग काढला आहे. तो म्हणाला की, ‘आता जर सलमानसोबत मी एखाद्या चित्रपट बनवला तर मी नक्कीच ‘ईद’चा मुहूर्त साधून तो चित्रपट रिलीज करेन.’ म्हणजे करणने पुढचा सगळा प्लॅन आखून ठेवलेला आहेत तर.‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुल्तान’ हे सलमानचे चित्रपट ईदला प्रदर्शित झालेले आहेत सर्वच्या सर्व सुपरहिट ठरलेले आहेत. म्हणून तर शाहरुखनेसुद्धा सलमानच्या ‘सुल्तान’सोबत टक्कर टाळण्यासाठी ‘रईस’ सात महिने पुढे ढकलून प्रजासत्ताक दिनाला रिलीज केला.‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. एक आगळीवेगळी प्रेमकथा यामध्ये पाहायला मिळणार असे ट्रेलर वरून दिसतेय. शंशाक खेतान दिग्दर्शित हा सिनेमा होळीला प्रदर्शित होणार आहे.ALSO READ: अनुराग कश्यपला करण जोहरसोबत न झोपण्याचा सल्ला देणाऱ्याला करणने केले त्याच्याच शब्दात गप्प!​