Join us

करण जोहरने सांगितले त्याचे 'रिलेशनशिप स्टेटस', पोस्ट शेअर करत म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:36 IST

करण जोहरने एका पोस्टद्वारे त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.

बॉलिवूडलचा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता म्हणजे करण जोहर (karan johar). तो कायमच लाईमलाइटमध्ये असतो. सिनेविश्वात कधी त्याच्या धर्मा प्रोडक्शनमुळे तर कधी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चा होताना दिसते.  सध्या करण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यानंतर तो चर्चेत आला. खरंतर करण जोहरने एका पोस्टद्वारे त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.

करण जोहरचं सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट करणं सुरुच असतं. आताही त्याने अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये करणने सध्याचे त्याचे रिलेशनशिप स्टेटस काय आहे त्याबद्दल सांगितले.  पोस्टमध्ये त्याने लिहलं, "मी सध्या इतका सिंगल आहे की मी एका खडकावर उभा राहून ओरडलो की मी तुझ्यावर प्रेम करतो. तर माझ्या प्रतिध्वनीने मला फक्त मित्र बनायचं आहे असे उत्तर दिलं".

करण जोहरने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेय डिसूझासोबतच्या संभाषणात करणने वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत जोडीदाराच्या शोधात होतो. मात्र, पन्नाशीनंतर शोध घेणे बंद केल्याचं सांगितलं होतं. करण जोहर अविवाहित असून सरोगसीद्वारे तो दोन मुलांचा बाबा आहे. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करण व त्याची आई हिरू जोहर दोघेही या मुलांचा सांभाळ करतात.

टॅग्स :करण जोहरइन्स्टाग्रामबॉलिवूड