Join us

जान्हवी कपूरच्या हातून निसटला ‘दोस्ताना2’; करण जोहरने केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 21:02 IST

करण जोहरच्या ‘दोस्ताना2’ या चित्रपटात जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागली, अशी बातमी आली आणि जान्हवी- सिद्धार्थच्या चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. 

करण जोहरच्या ‘दोस्ताना2’ या चित्रपटात जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागली, अशी बातमी आली आणि जान्हवी- सिद्धार्थच्या चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. पण करण जोहरच्या एका ट्विटने सगळ्यांचीच निराशा केली. होय, त्याने सगळ्यांच तर्क-वितर्कांवर पूर्णविराम लावला. ‘धडक’मधील शानदार अभिनयानंतर करणने जान्हवीला ‘तख्त’मध्ये घेतले. यापाठोपाठ ‘दोस्ताना2’साठीही करणने जान्हवीचीच निवड केल्याची चर्चा रंगली. जान्हवीच्या अपोझिट सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागणार, असेही सांगितले गेले. अखेर करणनेच याबद्दल खुलासा केला़‘दोस्ताना2’बद्दल ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या केवळ अफवा आहेत, असे करणने स्पष्ट केले.

‘दोस्ताना’ सुपरहिट झाल्यानंतर करण जोहर अनेक वर्षांपासून याचा दुसरा भाग बनवू इच्छित होता. पण आता या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे.  आता केवळ याची स्टारकास्ट ठरणे बाकी आहे, हेही करणच्या खुलाशानंतर स्पष्ट झाले आहे.२०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहमच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता.

टॅग्स :जान्हवी कपूर