Join us

​करण जोहर भारतातून पळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 15:46 IST

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध असंतोषाची सर्वाधिक झळ कुणाला पोहोचली असेल तर ती दिग्दर्शक करण जोहर याला. ...

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील पाकिस्तानी कलाकारांविरूद्ध असंतोषाची सर्वाधिक झळ कुणाला पोहोचली असेल तर ती दिग्दर्शक करण जोहर याला. करणच्या बहुप्रतिक्षीत ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान दिसणार आहे. फवादला या चित्रपटातून काढा अन्यथा ‘ऐ दिल है मुश्किल’वर बंदी लादू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्थात मनसेने करण जोहरला दिला आहे. यामुळे सध्या करण जाम टेन्शनमध्ये आलाय. इतका की, हे टेन्शन सहन न झाल्याने करणने काही दिवस देशाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी कलाकारांवरून निर्माण झालेल्या वादापासून दूर हा करणचा उद्देश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण लिस्बनला रवाना झाला आहे. याठिकाणी शाहरूख खानसोबत सुटी घालवण्याचा करणचा प्लॅन आहे म्हणे. शाहरूख सध्या लिस्बनमध्ये इम्तियाज अलीदिग्दर्शित ‘रिंग’ या चित्रपटाचे शूटींग करतोय.