करण जोहरने मागितली आलिया भट्टची माफी; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 11:37 IST
आलिया भट्ट सध्या तिच्या वजनाबद्दल कमालीची चिंतीत असते. एक किलो वजन वाढले तरी आलियाला काहीही सुचेनासे होते. मग तिचे ...
करण जोहरने मागितली आलिया भट्टची माफी; पण का?
आलिया भट्ट सध्या तिच्या वजनाबद्दल कमालीची चिंतीत असते. एक किलो वजन वाढले तरी आलियाला काहीही सुचेनासे होते. मग तिचे अनेक तास जिममध्ये जातात. इकडे आलिया तासन तास जिममध्ये घालवत असते आणि तिकडे यासगळ्यासाठी करण जोहर स्वत:ला जबाबदार मानत असतो.होय, हे आम्ही मनाचे सांगत नसून खुद्द करणनेच हे सांगितले आहे. केवळ सांगितले नाही तर यासाठी आलियाची माफीही मागितली आहे. सध्या करण एक रेडिओ शो होस्ट करतो आहे. याचदरम्यान एका कॉलरने करणला बॉडी शेमिंगबद्दल प्रश्न विचारला. कुण्या एका अभिनेत्रीला वजन कमी करण्यास सांगणे बॉडी शेमिंग मानले जावू शकते, असे तुला कधी वाटले का? असा प्रश्न या कॉलरने करणला विचारला. यावर करणने आलियाचे नाव घेतले. याच क्रमात करणने आलियाची माफीही मागितली. मी आलियाला वजन कमी करण्यासाठी म्हटले होते. आता ती वजनाबद्दल कमालीची क्रेझी झालीय. यासाठी मी स्वत:ला जबाबदार मानतो. आधी आलिया बरीच गोलमटोल होती. लॉन्च करण्याआधी मी तिला वजन कमी करण्यासाठी सांगितले होते. जेणेकरून ती मेनस्ट्रिम अभिनेत्रीसारखी दिसेल. माझ्या म्हणण्यावरून तिने वजन कमी केलेही. पण आता ती जेव्हा विचारावे तेव्हा जिममध्ये असते. तिचे एक किलोही वजन वाढले की ती अस्वस्थ होते. यासाठी मला जबाबदार ठरवले जायला हवे. आता मी एका मुलीचा बाप आहे. मी असे रूहीसोबत (करणची मुलगी) कधीही करणार नाही. त्यामुळे मी आता आलियाची माफी मागू इच्छितो, असे करण या कॉलरला उत्तर देताना म्हणाला.ALSO READ : OMG! आलिया भट्टकडे नाही डॅड महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी वेळ!!करणने ‘स्टुडंट आॅफ द ईअर’मधून आलियाला लॉन्च केले होते. स्वत: करणही लहानपणी खूप जाड होता. आपल्या आत्मचरित्रात करणने याबद्दल लिहिले आहे. लहानपणी माझे वजन खूप होते. या वाढलेल्या वजनामुळे मी स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा समजायचो. माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला होता, असे त्याने लिहिले आहे.