करण जोहर आणि दीपिका पादुकोण 'या' प्रोजेक्टसाठी आले एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 12:01 IST
पद्मावत चित्रपटानंतर दीपिका पादुकोण ही अनेक दिग्दर्शकांची आपल्या चित्रपटासाठी पहिली पसंती बनली आहे. नुकतेच करण जोहरने दीपिका पादुकोणसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
करण जोहर आणि दीपिका पादुकोण 'या' प्रोजेक्टसाठी आले एकत्र!
पद्मावत चित्रपटानंतर दीपिका पादुकोण ही अनेक दिग्दर्शकांची आपल्या चित्रपटासाठी पहिली पसंती बनली आहे. नुकताच करण जोहरने दीपिका पादुकोणसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. करण जोहर दीपिकाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नाहीय तर दोघे अॅडसाठी एकत्र आले आहेत. ही अॅड नेमकी कोणती आहे याबाबत अजून काही माहिती मिळू शकलेली नाही. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे 'धामा 2.0'साठी ही अॅड असल्याचे कळतेय. करणने पहिल्यांदाच एका अॅड शूटचे दिग्दर्शन केले आहे. पुनीत मल्होत्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. धमा प्रोडक्शनने एक नवा दिग्दर्शक लाँच केला आहे. दीपिका तुझ्यासोबत काम करायला मजा आली. ALSO READ : 'या' व्यक्तिसाठी रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण येणार एकत्र!दीपिका धर्मा प्रोडक्शनच्या ये जवानी है दिवानी चित्रपटात दिसली होती. अनेकवेळा कॉफि विथ करणमध्ये तिने हजेरी लावली आहे. दीपिकाच्या काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'पद्मावत' याचित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 300 कोटींचा गल्ला जमावला आहे. यानंतर ती विशाल भारव्दाज यांच्या 'सपना दीदी' या चित्रपटात दिसणार आहे मात्र इरफान खान सध्या न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजारची ट्रिटमेंट घेत असल्याने या चित्रपटचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतर दीपिका सध्या लग्नाच्या शॉपिंगला लागली असल्याचे कळतेय. दीपिका व रणवीर या दोघांनी लग्नासाठी यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील चार तारखा निश्चित केल्या आहेत. यापैकी एक तारीख अंतिमत: निश्चित करण्यात येईल. दीपिका व रणवीरचे लग्न एक खासगी सोहळा असेल. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक एवढेच या लग्नात असतील असे कळतेय. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे. रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.