Join us

​करणला माहित नाही ‘मनसे’चा लाँग फॉर्म’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 12:00 IST

करण जोहर आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे नाते अलिकडे जरा जास्तच घट्ट झाले आहे. चार वर्षांनंतर दिग्दर्शनात उतरलेला करण ‘ऐ दिल...’मुळे ...

करण जोहर आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे नाते अलिकडे जरा जास्तच घट्ट झाले आहे. चार वर्षांनंतर दिग्दर्शनात उतरलेला करण ‘ऐ दिल...’मुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यासाठी मनसेने केलेल्या आंदोलनाचा त्याला जबर फटका बसला.सर्व काही आता शांत झाल्यानंतर एका समारोहात जेव्हा त्याला ‘मनसे’चा लाँग फॉर्म विचारण्यात आला तेव्हा त्याचे उत्तर ऐकण्यासारखे होते. त्याचे झाले असे की, ट्विंकल खन्ना लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात करणने आलियाचा उल्लेख ‘भारताचे राष्ट्रपती माहित नसणाऱ्या मुलीपासून ते सुपरस्टार गर्ल’ असा केला. त्यावर ट्विंकलने लागलीच विचारले की, ‘करण जर तुझे सामन्य ज्ञान एवढे चांगले आहे तर ‘मनसे’चा लाँग फॉर्म काय ते सांग’.या अनपेक्षित प्रश्नामुळे त्याचा पुरता गोंधळ उडाला. तेथे उपस्थितांमध्येसुद्धा एक प्रकारची उत्सुकता निर्माण झाली. ‘करण जोहर’ आणि ‘मनसे’ यांचा एकाच वाक्यात उल्लेक होणे म्हणजे काही तरी वादाग्रस्त नक्कीच घडणार अशीच सध्या परिस्थिती आहे.करणने स्थिती सावरत विनोदी उत्तर दिले की, ‘मला ‘पीएमएस’चा लाँग फॉर्म माहिती आहे कारण मी सध्या त्याच परिस्थितीतून जातोय.’ यावर ट्विंकल म्हणाली की, ‘म्हणजे तुला ‘मनसे’चा लाँग फॉर्म माहित नाही तर?’मि. कॉन्ट्रोव्हर्सी : फवाद खानकरण म्हणाला की, ‘मला माहित आहे. पण सगळ्या राजकीय गोष्टींपासून चार हात लांब राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. आणि शक्य असल्यास कोणत्याच वादात पडू इच्छित नाही. झगमगाटापासून दूर राहण्याचा मी प्रयत्न करतोय.’ त्याच्या शेवटच्या वाक्यावर एकच हशा पिकला. करण आणि प्रकाशझोतापासून दूर हीच कल्पनाच खरी वाटत नाही. लोकांची रिअ‍ॅक्शन पाहून तो म्हणाला, ‘आहो माझ्या बोलण्याला असे हसण्यावारी घेऊ नका. मी खरं सांगतोय.’ बुलेया :रणबीर कपूरcnxoldfiles/a> निर्माते आणि पार्टीमध्ये तोडगा काढून दिवाळीच्या मुहूर्तावार सिनेमा रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे हीटदेखील ठरला.