Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिप्ससाठी करण बनला ‘कवी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 09:51 IST

करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु यांच्या लग्नाला आता केवळ सात दिवस बाकी असून लग्नाचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जरी ते एकमेकांसोबत दिसत असले तरी त्यांनी त्यांचे नाते कधीच जाहीर केले नाही. 

करणसिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासु यांच्या लग्नाला आता केवळ सात दिवस बाकी असून लग्नाचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जरी ते एकमेकांसोबत दिसत असले तरी त्यांनी त्यांचे नाते कधीच जाहीर केले नाही. जाहीर केली तर थेट लग्नाची तारीखच.वेल, आता तर लग्न जवळ आले आहे. त्या दोघांनीही बॅचलर पार्टीचा आनंद उपभोगला. आणि आता म्हणे त्यांना घरातून स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की, लग्नापर्यंत भेटायचे नाही. ओह....सो सॅड ना...बिप्स-करण ये दुरीयाँ नही सही जाती ना? माहितीये आम्हालाही.बरं... त्यामुळे करण कवीच्या भूमिकेत घुसलेला दिसतोय. आता तुम्ही विचाराल की कशावरून? तर हो. त्याने बिप्स आणि त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याखाली एक कविता बिप्ससाठी केली आहे. हा फोटो बिप्सनेही शेअर केला आहे.आणि त्याला इतक्या सुंदर कवितेसाठी थँक्स म्हटले आहे. त्याने लिहिले आहे की,‘ यू टेक अवे आॅल द डार्कनेस, यू टेक अवे आॅल माय पेन...यू वॉक मी थ्रू द स्टॉर्म, थ्रू सनशाईन अ‍ॅण्ड इव्हन द रेन...यू गिव्ह मी पीस, यू शॉवर मी विथ लव्ह अ‍ॅण्ड फिल एव्हरी मोमेंट आॅफ माय लाईफ विथ ग्ली....’