Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर सिस्टर्सचा ‘सेल्फी टाईम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 13:14 IST

 करिना कपूर खान ही गरोदर असून ती डिसेंबरमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या खान कुटुंबीय हे अत्यंत ...

 करिना कपूर खान ही गरोदर असून ती डिसेंबरमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे सध्या खान कुटुंबीय हे अत्यंत खुश आहेत. करिना आणि तिची बहीण करिश्मा हे त्यांचा जवळचा मित्र मनिष मल्होत्रा याच्या घरी गेल्या.तिथे त्यांनी मस्त धम्माल केली. आणि त्यांनी काढलेले सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केले. फोटोला त्यांनी कॅप्शन दिले की,‘अ‍ॅट होम..फन...रिलॅक्स्ड...इव्हिनिंग विथ माय फेव्हरेट्स...’ सध्या करिना कपूर तिच्या फिटनेस आणि फॅशनबद्दल प्रचंड उत्सुक आहे.मध्यंतरी एकदा बेबोने पार्टीत बीएफएफ सोबत एन्जॉय केले होते. करिना ही सध्या रिहा कपूर यांच्या ‘वीरें दी शादी’ साठी काम करते आहे. सोनम कपूर आणि स्वरा भास्कर हे तिच्यासोबत यात दिसणार आहेत.