Join us

​कपिल शर्माने ऐकवला सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणाचा वेगळाच किस्सा; म्हणे, भांडण झालेच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:51 IST

‘फिरंगी’च्या ट्रेलरपेक्षा ‘फिरंगी’च्या ट्रेलर लॉन्चचा सोहळाच सध्या अधिक चर्चेत आहे. कारण काय तर, कपिलने त्याच्या व सुनील ग्रोव्हरच्या भांडणाबद्दल केलेला एक धक्कादायक खुलासा. होय, ‘फिरंगी’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला काल कपिलने हजेरी लावली.

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर काल लॉन्च झाला. पण ‘फिरंगी’च्या ट्रेलरपेक्षा ‘फिरंगी’च्या ट्रेलर लॉन्चचा सोहळाच सध्या अधिक चर्चेत आहे. कारण काय तर, कपिलने त्याच्या व सुनील ग्रोव्हरच्या भांडणाबद्दल केलेला एक धक्कादायक खुलासा. होय, ‘फिरंगी’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला काल कपिलने हजेरी लावली.साहजिक त्याला सुनील ग्रोव्हरबद्दल प्रश्न त्याला हमखास विचारला गेला. कपिलनेही फार आढेवेढे न घेता या प्रश्नाचे उत्तर दिले. पण कपिलने जे सांगितले ते यापूर्वी आपण ऐकलेल्या ‘स्टोरी’पेक्षा पूर्णपणे वेगळे होते. होय, सुनीलसोबत माझे भांडण झालेच नाही, असा दावा कपिलने यावेळी केला. ‘शोमध्ये सुनील हाच माझा सगळ्यात आवडता मित्र होता. त्याच्यासोबत मी जवळपास पाच वर्षे काम केले. या पाच वर्षांत मी एकदाही स्वत:ला त्याच्यावर हावी होऊ दिले नाही. त्यादिवशी जे काही झाले ते मी सांगू इव्छितो. खरे तर त्यादिवशी माझे व सुनीलचे थेट असे कुठलेच भांडण झाले नव्हते. आॅस्ट्रेलियात मी स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स करणार होतो. त्याचदरम्यान एका लेडी आर्टिस्टने एका मेल आर्टिस्टबद्दल अरेरावीबद्दल माझ्याकडे तक्रार केली. यानंतर माझी व त्या मेल आर्टिस्टची थोडीफार बाचाबाची झाली. मला पाच मिनिटांत स्टेजवर जायचे आहे, तेव्हा भांडू नकोस, असेही मी त्याला त्यावेळी बजावले होते. यानंतर शो संपल्यावर चंदन बॅग उचलून चालता झाला. पाच दिवसांनंतर आम्ही भारतात परत येत असताना चंदन मला विमानात भेटला. त्यावेळी त्याच्यात अन् माझ्यात थोडाफार वाद झाला. पण हा वाद मीडियात सांगितला गेला, तेवढा मोठा नक्कीच नव्हता. फक्त मला एवढेच म्हणायचे की, मी सुनील ग्रोव्हरच्या जागी असतो तर काय झाले यार, असे एकदा विचारले असते. जे त्याने केले नाही,’ असे कपिलने यावेळी सांगितले. एकंदर काय तर कपिल सांगतो त्याप्रमाणे त्याचे अन् सुनीलचे भांडण झालेच नाही. आता असे असेल तर कपिल वा सुनील या दोघांपैकी कुणावर विश्वास ठेवायचा, हे तुम्हीच ठरवा.कपिलचा ‘फिरंगी’ येत्या २४ नोव्हेंबरला रिलीज होतो आहे. राजीव ढिंगराने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.ALSO READ: कपिल शर्मा व गिन्नी चतरथचे ब्रेकअप! किती खरे, किती खोटे!! वाचा, आणखी एक धक्कादायक बातमी!