Join us

कपिल शर्माला मिळाला आणखी एक चित्रपट? तब्बू, क्रिती अन् करिनासोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:08 IST

'द क्रू' सिनेमाच्या चित्रीकरणाला मागच्याच महिन्यात सुरुवात झाली.

निर्माती एकता कपूरने (Ekta Kapoor) आपल्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा केली आहे. तबू (Tabu), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) अशा आघाडीच्या अभिनेत्रींना घेऊन 'द क्रू' हा सिनेमा येत आहे. आता माध्यम रिपोर्टनुसार या सिनेमात कॉमेडी किंग कपिल शर्माचीही (Kapil Sharma) एंट्री झाली आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

'द क्र्यू' सिनेमाच्या चित्रीकरणाला मागच्याच महिन्यात सुरुवात झाली. यामध्ये दलजीत दोसांझही (Diljit Dosanjh) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही एक कॉमेडी फिल्म असून राजेश कृष्णनन यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. एकता कपूर म्हणाली, 'द क्रू प्रेक्षकांचं मनोरंजन करेल आणि सोबतच प्रोत्साहनही देईल. सिनेमाची जादू टीमवर्कमुळे घडते. मी या फिल्मसाठी खूपच उत्सुक आहे.'

2018 साली आलेल्या 'वीरे दी वेडिंग' नंतर हे एकता आणि रियामध्ये दुसरं कोलॅबोरेशन आहे. भारताच्या अनेक भागात याचं शूट होणार आहे. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच त्याच्या शो मध्ये तब्बू सोबत काम करायचे अशी इच्छा बोलून दाखवली होती. तेव्हा तब्बू 'दृश्यम 2' च्या प्रमोशनसाठी शोमध्ये आली होती. आता कपिलने तेव्हा ती हिंटच दिली होती की काय अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

टॅग्स :कपिल शर्मा तब्बूकरिना कपूरक्रिती सनॉनएकता कपूर