कपिल शर्मा बसला घरी, सुनील ग्रोव्हरला लागली लॉटरी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 15:48 IST
कॉमेडियन कपिल शर्मा सध्या घरी बसलायं. त्याच्या घरी बसण्यावरून अनेक चर्चांणा उधाण आले आहे. कुणी तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे ...
कपिल शर्मा बसला घरी, सुनील ग्रोव्हरला लागली लॉटरी!!
कॉमेडियन कपिल शर्मा सध्या घरी बसलायं. त्याच्या घरी बसण्यावरून अनेक चर्चांणा उधाण आले आहे. कुणी तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे म्हणतेय, कुणी त्याला व्यसनाने घेरल्याचे बोलतोय, तर कुणी यश, पैसा, प्रसिद्धी त्याच्या डोक्यात गेल्याचे बोलून दाखवतयं. यातले खरे काय, आम्हाला ठाऊक नाही आणि खरे तर त्याबद्दलची बातमीही नाही. सध्या बातमी आहे ती, कपिलचा एकेकाळचा मित्र आणि सहकारी सुनील ग्रोव्हर याच्याबद्दलची. होय, कपिल एकीकडे घरी बसलायं तर दुसरीकडे सुनीलच्या करिअरची गाडी सूसाट सुटलीय. होय, लवकरच सुनीलचा ‘जिओ धप धना धन लाइव्ह’ हा नवा कोरा शो सुरू होत आहे. याशिवाय सुनीलला आणखी एक लॉटरी लागली आहे. होय, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘छुरियां’ या आगामी चित्रपटात सुनीलची वर्णी लागली आहे. खुद्द विशाल भारद्वाज यांनी ही माहिती दिली आहे. सुनील एक उत्तम अभिनेता आहे. त्याचा अभिनय पाहून मी कमालीचा प्रभावित झालो. माझ्या चित्रपटात त्याची एक अंत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याच्यासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे, असे त्यांनी सांगितले. तूर्तास सुनील या चित्रपटात काय भूमिका साकारणार, याबद्दल खुलासा झालेला नाही. तो लवकरच होईल, अशी आशा करूयात.ALSO READ : श्रीलंकेच्या रस्त्यावर दिसला ‘ डॉ. मशहूर गुलाटी’चा ‘डुप्लिकेट’! विश्वास बसत नसेल तर एकदा पाहाचं! ‘छुरियां’त ‘दंगल’ फेम सान्या मल्होत्रा लीड रोलमध्ये आहे. तिच्याशिवाय ‘मेरी आशिकी तुमसे है’ फेम राधिका मदान ही सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सान्या व राधिका या दोघीही या चित्रपटात बहीणींच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट राजस्थानात राहणाºया दोन बहीणींची कथा आहे. या दोन्ही बहिणींचे लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे आयुष्य यात दिसणार आहे. या चित्रपटासाठी सान्या आणि राधिका दोघींनाही १० ते १२ किलो वजन वाढवावे लागणार आहे. चालू महिन्याच्या अखेरिस या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल.