Join us

कपिल देवची साथ मिळताच मॅडी झाला 'फनबॉय'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:27 IST

बॉलिवूड अभिनेता आर.माधवनचे गोल्फ प्रेम लपलेले नाही. वेळ मिळल्यास तो या खेळाला एन्जॉय करतो. नुकताच मॅडी पुण्यात गोल्फ मॅचच्या ...

बॉलिवूड अभिनेता आर.माधवनचे गोल्फ प्रेम लपलेले नाही. वेळ मिळल्यास तो या खेळाला एन्जॉय करतो. नुकताच मॅडी पुण्यात गोल्फ मॅचच्या निमित्ताने आला होता. यावेळी त्याची भेट क्रिकेटर कपिल देव यांच्याशी झाली. सिनेमात सिरिअस दिसणारा मॅडी एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे कपिल देव यांच्याशी गप्पा, गोष्टी व फन करताना दिसला. या भेटीचा सेल्फी स्वत: माधवने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ​माधवन क्रिकेट लिजेंड कपिल देव यांचा मोठा फॅन आहे. पुण्यात क्रिकेटर कपिल देव याच्याशी गोल्फ मैदानावर झालेली भेट ही त्याच्यासाठी एक पर्वणीच ठरली. या संधीचा पुरेपुर फायदा घेत आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूसोबत त्याने भरपूर वेळ घालविला. ही भेट आपल्या जीवनातील महत्त्वाची आहे असे मानून त्याने कपिल देव यांच्याशी भरपूर चर्चा केली. माधवन गोल्फबद्दल क्रेझी असल्याचे माहित होताच त्यांनी गोल्फ व क्रिकेट बद्दल बरीच चर्चा केली. क्रिकेटर असलेल्या कपिल देव यांचेही गोल्फ प्रेम सर्वश्रृत आहे. क्रिकेटमधून सन्यास घेतल्यावर ते गोल्फचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. कपिल स्वत: चांगले गोल्फ खेळाडू आहेत. तर माधवन हादेखील गोल्फसाठी क्रेझी आहे. आता माधवनने कपिलकडून गोल्फच्या टिप्सही घेतल्या असतील. यामुळे त्याचे गोल्फ परफार्मन्स नक्कीच वाढेल असे दिसते.