Join us

लेकीच्या वेदना पाहून ढसाढसा रडला ‘हा’ सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 14:01 IST

आपल्या बाळाच्या डोळ्यातून येणारे अश्रू बघितले कुठल्याही आई-वडिलांच्या मनात कालवाकालव सुरु होते. एक असाच सुपरस्टार, मुलीला रडताना पाहून स्वत:ही रडू लागला.

ठळक मुद्देयशचा ‘केजीएफ-चॅप्टर 1’ हा कन्नड भाषेतील पीरियड ड्रामा लोकांना भावला होता.

सामान्य व्यक्ती असो वा चित्रपटाचा स्टार आई-वडिल बनण्याचा अनुभव प्रत्येकासाठी सारखाच असतो. आपल्या बाळाच्या डोळ्यातून येणारे अश्रू बघितले कुठल्याही आई-वडिलांच्या मनात कालवाकालव सुरु होते. एक असाच सुपरस्टार, मुलीला रडताना पाहून स्वत:ही रडू लागला. त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट लिहून या भावूक प्रसंगाबद्दल सांगितले आहे.हा सुपरस्टार कोण तर दाक्षिणात्य अभिनेता यश. ‘केजीएफ’ सारखा सुपरडुपर हिट सिनेमा देणा-या यशला 9 महिन्यांची मुलगी आहे. तिचे नाव आर्या. याच आर्याचे नुकतेच कान टोचले गेले. पण लेकीच्या वेदना पाहून यश अगदी ढसाढसा रडला.

यशची पत्नीने हा प्रसंग सांगताना लिहिले,‘आम्ही आर्याचे कान टोचून घेतले. पालक म्हणून हा सर्वात आव्हानात्मक प्रसंग होता. ती रडत होती आणि तिला रडताना पाहून आम्हा दोघांचे काळीज तुटत होते. तिचा पापा तर ढसाढसा रडला. मी पहिल्यांदाच या ‘रॉकिंग स्टार’च्या  डोळ्यांत अश्रू पाहिले. बाप-लेकीचा हा बॉन्ड किती अमूल्य आहे, हे त्याचक्षणी अनुभवले.’ 

राधिका पंडित आणि यश हे दोघेही दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील गाजलेले सेलिब्रिटी आहेत. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या दोघांनी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2018 मध्ये आर्याच्या रुपात त्यांच्या जीवनात एका नव्या चिमुकलीचे आगमन झाले.

यशचा ‘केजीएफ-चॅप्टर 1’ हा कन्नड भाषेतील पीरियड ड्रामा लोकांना भावला होता. या चित्रपटात एका अनाथ मुलाची कथा दाखवली गेली होती. हा चित्रपट तुफान गाजला होता. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :यश