कंगनाला राणौतला झाली शाहिद कपूर, सैफ अली खानमुळे अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 12:20 IST
बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत आपल्या सोबत काम करणाºया कलांवतांसाठी अडचण करणारी मानली जाते. सेटवर उशीरा पोहोचणे किंवा आपल्या ...
कंगनाला राणौतला झाली शाहिद कपूर, सैफ अली खानमुळे अडचण
बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत आपल्या सोबत काम करणाºया कलांवतांसाठी अडचण करणारी मानली जाते. सेटवर उशीरा पोहोचणे किंवा आपल्या फीससाठी ती अनेकदा चर्चेत आली आहे. मात्र ‘रंगून’मध्ये काम करताना कं गनाला अडचणीचा सामना करावा लागला. एका मुलाखती दरम्यान कंगना म्हणाली, रंगूनचे सीन शूट करताना मला शाहिद कपूर व सैफ अली खान यांच्यासोबत इंटिमेट सिन्समध्ये किस करताना करताना अडचण होत होतीमुलाखतीमध्ये कंगना म्हणाली, या चित्रपटात मला शाहिद व सैफच्या पे्रयसीची भूमिका करायची असल्याने दोघांसोबत माझे इंटिमेट सिन्स होते. मात्र हे सीन करताना मला दोघांच्या मिशामुळे किस करताना अडचण होती होती. अशा वेळी हा सीन कधी पूर्ण होतो असे वाटत होते. विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगून या चित्रपटात सैनिकाच्या भूमिके त असलेल्या शाहिदने पिळदार मिशा ठेवल्या आहेत. तर सैफ अली खान याने देखील कट मिशा आहेत. रंगूनमध्ये कंगना सिडक्ट्रेस जुलिया नावाची एका अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे. सुरुवातीला तिचा फिल्ममेकर असलेल्या सैफसोबत रोमांस दाखविण्यात आला आहे. मात्र सैन्याच्या मनोरंजनासाठी गेल्यावर नवाब मलिकवर (शाहिद कपूर) तिचा जीव जडतो, दुसरीकडे शाहिदचेही तिच्यावर प्रेम जडते. रंगून हा युद्धकथेवर आधारित प्रेम त्रिकोण असून शाहिद कपूर व सैफ अली खान या दोन्ही अभिनेत्यांसोबत कंगनाने बोल्ड सिन्स दिले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर काही सिन्समध्ये कं गना टॉपलेस दिसली आहे. कंगनाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या असून प्रेम त्रिकोण असलेला हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातील पार्श्वभूमी १९४०च्या दशकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्रलढ्याशी या चित्रपटाचा संबंध दर्शविण्यात आला असून २४ फेब्रुवारीला रंगून प्रदर्शित होणार आहे.