श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्याने कंगना राणौतला भरला ताप! थांबवावे लागले ‘मणिकर्णिका’चे शूटींग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 11:02 IST
श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. प्रत्येकजण श्रीदेवींच्या अशा जाण्याने धक्क्यात आहे. श्रीदेवींना आपला आदर्श मानणारी ...
श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्याने कंगना राणौतला भरला ताप! थांबवावे लागले ‘मणिकर्णिका’चे शूटींग!!
श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. प्रत्येकजण श्रीदेवींच्या अशा जाण्याने धक्क्यात आहे. श्रीदेवींना आपला आदर्श मानणारी अभिनेत्री कंगणा राणौत हिला तर या बातमीचा इतका मोठा धक्का बसला की, ती आजारी पडली. कंगना आजारी पडल्याने ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’चे शूटींग काही तास थांबवावे लागले. कंगनाला जवळून ओळखणा-यांच्या मते, कंगना भलेही कुणाला काही बोलली नाही. पण श्रीदेवींच्या जाण्याचे दु:ख ती पेलू शकली नाही. आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या अशा अचानक जाण्याने ती इतकी हादरली की आजारी पडली. कंगना बिकानेरमध्ये ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’चे शूटींग करत आहे. रविवारी शूटींग सुरू होणार, तोच श्रीदेवींच्या निधनाची बातमी कंगनाला मिळाली. ही बातमी ऐकून कंगना इतकी उदास झाली की, तिला अचानक ताप भरला. यानंतर काही तास चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले. अर्थात काही तासांच्या विश्रांतीनंतर कंगनाने स्वत:ला सावरले आणि ती पुन्हा सेटवर हजर झाली. निर्मात्यांचा खोळंबा नको, या विचाराने तिने पुन्हा स्वत:ला कामात जुंपून घेतले. जानेवारीअखेरिस कंगना व श्रीदेवी यांची भेट झाली होती. अनुराग बासू यांच्या घरी आयोजित पूजेत श्रीदेवी व कंगना भेटल्या होत्या. त्या दोघींचे हास्यविनोद करतानाचे फोटोही व्हायरल झाले होते.ALSO READ : श्रीदेवींचे पार्थिव भारतात येण्यास होऊ शकतो विलंब! प्रकरणातील गुंता वाढला!!गत शनिवारी रात्रीच्या सुमारास दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींचा मृत्यू झाला. आधी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगण्यात आले. पण काल या प्रकरणाला वेगळेच वळण लाभले. श्रीदेवींचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने नाही तर बाथटबमध्ये बुडून झाला, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. श्रीदेवींच्या रक्तात अल्कोहोलचे अंशही सापडले. नशेत तोल गेल्याने श्रीदेवी बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमध्ये बुडून त्यांना मृत्यू झाला, असे सांगण्यात येतेयं. सध्या दुबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.