Join us

कंगना राणौतचा आरोप : हृतिकने माझे करिअर संपवण्यासाठी सगळे प्रयत्न केलेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 12:48 IST

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्या वादात आणखी एक नवी ठिणगी पडली आहे. होय, मध्यंतरी हृतिक व कंगना दोघांनीही ...

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्या वादात आणखी एक नवी ठिणगी पडली आहे. होय, मध्यंतरी हृतिक व कंगना दोघांनीही हा वाद निकाली काढल्याची बातमी आली. पण कदाचित हा वाद विसरायला दोघेही तयार नाही. कारण जरा काही निवळले की, दोघांपैकी कुणी एक काहीतरी कुरापत काढत आणि मग वाद पुन्हा पेटतो. यावेळी कंगनाने ठिणगी टाकली आणि वादाने लगेच पेट घेतला.अलीकडे एका मुलाखतीत कंगना या वादावर पुन्हा बोलली. केवळ बोलली नाही तर तिने हृतिकवर अनेक गंभीर आरोपही केलेत. ती म्हणाली, ज्यावेळी माझ्यातला आणि हृतिकमधला वाद चव्हाट्यावर आला तेव्हा हृतिक इंडस्ट्रीमधील सगळ्यांकडे जाऊन रडत होता. तो किती खरा अन् मी किती खोटे, हे लोकांना पटवून देण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. माझे करिअर खराब करणे, हाच त्याचा हेतू होता. लोक मला फोन करून सांगायचे की, हृतिकने तुझ्याविरोधातले पुरावेही आम्हाला दाखवले. पण कदाचित इतके पुरावे असूनही लोकांना माझी बाजूही ऐकायची असायची. अनेकांनी मला फोन केलेत. पण तुमचे या वादाशी काहीही देणेघेणे नाही, केवळ एवढेच मी त्यांना केवळ सांगायचे. मला सगळ्यांसमोर एक्सपोज करण्याची धमकीही दिली. पण ही धमकी पोकळ आहे, हे मला ठाऊक होते. मला एक्सपोज करण्यासारखे त्यांच्याजवळ काहीही नाही. असे लोक केवळ धमक्याच देणार, हे मी जाणून होते. म्हणून मी ठाम राहिले आणि सगळ्यांना पुरून उरले.कंगना सध्या ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हृतिक व तिच्या वादाबद्दल कुणीही छेडायची देर, कंगना मनात असले नसले सगळे बोलून जाते. ही ताजी मुलाखत त्याचाच एक नमुना. आता यावर हृतिक काय, बोलतो, ते बघूच!!काय आहे प्रकरण?एका मुलाखतीत कंगनाने हृतिकला ‘सिली एक्स’ म्हटले होते. यानंतर  हृतिकने कंगनाला अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली होती. कंगनानेही या नोटीसला उत्तर देत हृतिकला २१ पानांची नोटीस बजावली आहे. यानंतर दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करत सुटले होते.हृतिकचे आरोप1. कंगनाने मला १४३९ ईमेल पाठवले होते. यापैकी बºयाच ईमेलकडे मी दुर्लक्ष केले. हे सर्व ईमेल व्यक्तिगत, अभद्र भाषेत लिहिलेले होते.२. कंगना ही Aspergers Syndromeने ग्रासलेली आहे. यामुळे ती कल्पनेत जगते. कल्पना रंगवते.कंगनाचे आरोपहृतिकनेच माझ्याशी बोलण्यासाठी खास ईमेल आयडी तयार केला होता. हृतिक  व सुजानचे नाते, त्यांच्यातील घटस्फोट याबाबत हृतिकने अनेकदा माझ्याशी वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. मी दिवसाला ५० ईमेल पाठवायची,असा हृतिक दावा करतो. असे असेल तर एकूण ६०१ दिवसांत माझ्याकडून हृतिकला ३० हजार ईमेल मिळायला हवेत. पण हृतिकने माझ्याकडून १४३९ ईमेल मिळाल्याचा दावा केला आहे. यावरूनच त्याचे दावे किती खोटे आहेत, हे कळते.2. मी नाही तर हृतिक स्वत: मानसिक रूग्ण आहे.ALSO READ ​सैफ अन् शाहीदच्या मिशांमुळे इतकी का वैतागली कंगना राणौत?​कंगना रानौतने नाकारला इशान खट्टरचा डेब्यू चित्रपट?