Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतसोबत काम करण्यास उत्सुक; शाहरूख खानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 22:00 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता दस्तुरखुद्द शाहरूखनेच पूर्णविराम दिला आहे. ‘संजय लीला ...

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता दस्तुरखुद्द शाहरूखनेच पूर्णविराम दिला आहे. ‘संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात मला कंगनासोबत काम करायचे नाही’ अशी चर्चा निव्वळ अफवा असल्याचे शाहरूखने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात कंगना-शाहरूख एकत्र दिसण्याची शक्यता आता वाढली आहे. जेव्हा शाहरूखला कंगनासोबत काम करण्यावरून विचारण्यात आले तेव्हा शाहरूखने म्हटले की, ‘तुम्ही आॅनलाइन जे काही वाचता त्यावर फारसा विश्वास ठेवत जाऊ नका’ कारण माझ्या आणि कंगना विषयीच्या या चर्चा निव्वळ अफवा आहेत. गेल्या शनिवारी शाहरूखला यश चोपडा नॅशनल मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याने विचारलेल्या अनेक प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यात त्याने कंगनाविषयीच्या प्रश्नांचादेखील खुलासा केला. तसेच तू यशराजच्या सिनेमात पुन्हा केव्हा बघावयास मिळशील यावरही त्याने प्रतिक्रिया दिली. शाहरूख म्हणाला की, याचे उत्तर मला देता येणार नाही. कारण याविषयी अद्यापपर्यंत कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, यशराज सोबत काम करणे खूपच व्यक्तिगत आहे. कारण त्यांच्यासोबत तब्बल २० वर्षे काम केले आहे. पुढे बोलताना शाहरूख म्हटला की, काळानुसार मी येथे आलो, पण आज ते आपल्यात नाहीत. मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की, त्यांच्या अखेरच्या सिनेमातील शॉटचा मी भाग राहिलो आहे. शाहरूखचे रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनर यश चोपडा यांच्या मर्डर मिस्ट्री ‘इत्तेफाक’च्या रिमेकमध्ये सहनिर्मिती करीत आहे. याचा पहिला सीक्वल १९६९ मध्ये रिलीज झाला होता.यावर बोलताना शाहरूखने म्हटले की, मला या सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. परंतु काही अन्य कारणांमुळे मी ते करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी कंगनाने करण जौहरच्या शोमध्ये तिन्ही खानबरोबर काम करण्यास उत्सुक नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर शाहरूखनेदेखील कंगनासोबत काम करण्यास नकार दिल्याची अफवा पसरविण्यात आली होती. अखेर शाहरूखने यासर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. ALSO READ : कंगना राणौतच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे नाराज शाहरुख खानने तोडले तिचे स्वप्न