Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगणा-हृतिकचा महासंग्राम रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 11:54 IST

सध्या बी-टाऊनमध्ये बॉलीवुडचा सुपरहिरो हृतिक रोशन आणि बॉलीवुड क्वीन कंगणा राणौत यांच्यात महायुद्ध रंगलंय. दोघांकडून एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु ...

सध्या बी-टाऊनमध्ये बॉलीवुडचा सुपरहिरो हृतिक रोशन आणि बॉलीवुड क्वीन कंगणा राणौत यांच्यात महायुद्ध रंगलंय. दोघांकडून एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु आहे. दोघांच्या या भांडणामुळं अवघं बॉलीवुड ढवळून निघालंय.. मात्र आता दोघांचा हाच महासंग्रामावर रुपेरी पडद्यावर आणण्याचा विचार काही फिल्ममेकर्सनी केलाय.. काहींनी तर थेट याबाबत स्क्रीप्ट घेऊन हृतिक रोशनशी संपर्क साधलाय. हृतिकलासुद्धा ही आयडियाची कल्पना चांगलीच भावलीय. या स्क्रीप्टमध्ये तोही इंटरेस्ट घेऊ लागलाय.. अशा सिनेमात काम करण्याची तयारी त्यानं दर्शवल्याचं समजतंय.. या सिनेमात कंगणाची भूमिका एखाद्या पझेसिव्ह प्रेमिकेची असणार असल्याचं बोललं जातंय. मात्र सध्या हृतिक 'मोहन्जेंदडो' आणि काबील सिनेमात बिझी आहे.. असं असतानाही हृतिक कंगणासोबतच्या वादावरील सिनेमाबाबत बराच उत्सुक आहे..