कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली. होय, या महिन्यात १८ तारखेला ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर प्रदर्शित होतोय. या ट्रेलर रिलीजसाठी एका भव्या इव्हेंटचे आयोजन करण्यात येणार आहे. कंगना राणौत व ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ची अख्खी टीम या इव्हेंटला हजर असेल. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर रिलीज केला गेला होता. त्यात कंगना घोडेस्वारी करताना दिसली होती.
या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 14:14 IST
कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ रिलीजसाठी सज्ज आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचे अनेक पोस्टर आले आहेत. आज या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहिर करण्यात आली.
या दिवशी प्रदर्शित होणार ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चा ट्रेलर!
ठळक मुद्दे कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. यादरम्यान तिने अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये नव्याने चित्रीकरण केलीत. यानंतर चित्रपटाच्या एडिटींगचा जिम्माही तिने सांभाळला. केवळ इतकेच नाही तर व्हिएफएक्स, म्युझिक व फायनल कटचे कामही तिने पाहिले.