Join us

​कंगना राणौत पुन्हा बोलली! म्हणे, ‘पद्मावती’चा वाद निव्वळ ड्रामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 10:24 IST

‘पद्मावती’ चित्रपटावरून निर्माण झालेले वादळ गेल्या काही दिवसांत शांत झाले आहे. अर्थात ते पुन्हा त्याच वेगाने घोंगावू शकते. तूर्तास ...

‘पद्मावती’ चित्रपटावरून निर्माण झालेले वादळ गेल्या काही दिवसांत शांत झाले आहे. अर्थात ते पुन्हा त्याच वेगाने घोंगावू शकते. तूर्तास आम्हाला ‘पद्मावती’चा वाद आठवण्याचे कारण म्हणजे कंगना राणौत. होय,कंगनाने या वादासंदर्भात दीपिका पादुकोणसह मेकर्सला पाठींबा देण्यास नकार दिला, हे आपल्याला ठाऊक आहेच. ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांची छेडछाड झाल्याचा आरोप करत या चित्रपटाला अनेक संघटना, राजकीय पक्षांनी विरोध चालवला आहे.  या पार्श्वभूमीवर काही विरोध करणाºयांनी ‘पद्मावती’ची लीड हिरोईन दीपिका पादुकोणचे नाक कापण्याची धमकी दिली होती. यानंतर शबाना आझमी यांनी ‘दीपिका बचाओ’ मोहिम उघडली होती. मात्र कंगनाने या मोहिमेला पाठींबा देण्यास नकार दिला होता. ही सगळी पार्श्वभूमीवर सांगण्याचे कारण म्हणजे, कंगनाने पुन्हा या मुद्यावर आपले परखड मत मांडले आहे. कंगनाच्या मते, ‘पद्मावती’वरून जे काही सुरू आहे, ते केवळ एक नाटक आहे. ‘पद्मावती’चा वाद मला निव्वळ नाटक वाटत होते. काहींनी दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. माझ्या मते, या धमकी देणाºयांना केवळ आपली प्रतिक्रिया हवी होती. आपण बोलून फसू, या प्रतीक्षेत ते होते. काही लोक या वादाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत होते. दीपिकाला धमकी देऊन स्वत: लोकप्रीय मिळवणे हा काहींचा प्रयत्न आहेत. मी दीपिकासोबत आहे. पण माझ्या पद्धतीने, असे कंगना ताज्या मुलाखतीत म्हणाली. या वादाच्या खोलात जाण्याची गरजही तिने यावेळी बोलून दाखवली.ALSO READ : Padmavati Controversy : कंगना राणौतने दीपिका पादुकोणला पाठींबा देण्यास का दिला नकार? वाचा, कारण!‘पद्मावती’ वाद एक मोठा विषय आहे. यावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन केली जावी. सध्या प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. ते या काळातील अनेक विचारवंतांपैकी एक आहेत. कदाचित ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष नसते तर चिंतेचे कारण होते. पण खरे सांगायचे तर ‘पद्मावती’शी जुळलेला वाद एखाद्या नाटकापेक्षा अधिक काहीही नाही, असेच मला मनातून वाटते आहे. त्यामुळे याच्या खोलात जाण्याची गरज आहे, असेही ती म्हणाली.