Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या वडिलांना हे प्रश्न सुद्धा विचार...! ट्विटरवर कंगना राणौत- पूजा भटमध्ये घमासान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 11:26 IST

नेपोटिजमचा वाद शिगेला पोहोचला असताना पूजा भटने या वादात उडी घेतली. कंगनाला भट कुटुंबानेच लॉन्च केले म्हणत, तिने कंगनावरही हल्ला चढवला. मग काय, कंगनाही मैदानात उतरली.

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत व रिशा चक्रवर्ती यांच्या नात्यात मुकेश भट यांना इतका इंटरेस्ट का होता? त्यांनी सुशांतच्या मृत्यूचे भाकीत का केले होते? असे प्रश्नही तू तुझ्या वडिलांना विचारायला हवेत,’ असेही कंगनाने पूजाला सुनावले.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिजमचा मुद्दा ऐरणीवर आला असताना आता कंगना राणौत आणि पूजा भट यांच्या नवे ट्विटरवॉर सुरु झाले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर वार करत करण जोहरसह अनेकांना धारेवर धरले होते. हा वाद शिगेला पोहोचला असताना पूजा भटने या वादात उडी घेतली. कंगनाला भट कुटुंबानेच लॉन्च केले म्हणत, तिने कंगनावरही हल्ला चढवला. मग काय, कंगनाही मैदानात उतरली. दोघींमध्ये चांगलेच ट्विटरवॉर रंगले.

काय म्हणाली पूजानेपोटिजमच्या ज्वलंत मुद्यावर मला बोलण्यास सांगितले गेलेय.  ज्या कुटुंबाने नेहमीच नव्या कलाकारांना, तंत्रज्ञांना, संगीतकारांना संधी दिली त्या कुटुंबातील व्यक्तीला  नेपोटिजमवर बोलायला सांगत आहेत. मी यावर फक्त हसू शकते. लोकांना सत्य स्वीकारायचे नसते.   काल्पनिक गोष्टींवर त्यांचा लगेच विश्वास बसतो.

कंगना खूप चांगली अभिनेत्री आहे. तिच्यात प्रतिभा आहेच. ती नसती तर विशेष फिल्म्सने बॅनरअंतर्गत ‘गँगस्टर‘ चित्रपटातून तिला लाँच केले नसते. अनुराग बासूने तिला शोधले, हे मान्य. पण विशेष फिल्म्सने तिला लाँच केले. ही काही छोटी गोष्टी नाही, असे पूजाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले.

केवळ इतकेच नाही तर नेपोटिजम हा शब्द  इतरांसाठी वापरा, आमच्या कुटुंबासाठी नाही, असेही पूजाने एका टिष्ट्वटमध्ये बजावले. ‘असे अनेक जण आहेत ज्यांचा आमच्यामुळे चित्रपटसृष्टीचा मार्ग मोकळा झाला. ते जर आता आम्हाला विसरले असतील तर त्यांचे दुर्दैव आहे, आमचेनाही,’ असे ती म्हणाली.  तिच्या या ट्विटवरून लोकांनी लगेच पूजाला ट्रोल करणे सुरु केले. अनेकांनी तिला सुनावले. यानंतर कंगना राणौतही मैदानात उतरली. तिने तर पूजाला चांगलेच फैलावर घेतले.

कंगना म्हणाली...

पूजा भट, तुझ्या माहितीसाठी सांगते की, ‘गँगस्टर’शिवाय मी साऊथच्या ‘पोकरी’साठीही आॅडिशन दिले होते. तिथेही मी सिलेक्ट झाले होते. पोकरी हा सिनेमाही ब्लॉकबस्टर होता. मी आज जे काही आहे ते ‘गँगस्टर’मुळे आहे असे वाटत असेल तर ते चूक आहे. पाण्याला वाट मिळतेच, अशा शब्दांत कंगनाने पूजाला उत्तर दिले.

‘प्रिय पूजा अनुराग बासूने माझ्यातील प्रतिभा ओळखली होती. प्रत्येकाला ठाऊक आहे की, मुकेश भट यांना (महेश भट यांचा भाऊ) कलाकारांना पैसे देणे आवडत नाही. अनेक स्टुडिओ प्रतिभावंताकडून फुकट काम करून घेणे पसंत करतात. पण याचा अर्थ हा नाही की, तुझ्या वडिलांनी माझ्यावर चप्पल भिरकावी. मला वेडे म्हणावे. माझा अंत दु:खद असल्याची भविष्यवाणी करणारे महेश भट होते. सुशांत सिंग राजपूत व रिशा चक्रवर्ती यांच्या नात्यात मुकेश भट यांना इतका इंटरेस्ट का होता? त्यांनी सुशांतच्या मृत्यूचे भाकीत का केले होते? असे प्रश्नही तू तुझ्या वडिलांना विचारायला हवेत,’ असेही कंगनाने पूजाला सुनावले. 

 

टॅग्स :कंगना राणौतपूजा भट